डेहराडूनमध्ये (Dehradun) पहिल्यांदाच उत्तराखंड (Uttarakhand) सरकारने कठोर कारवाई करत बेकायदेशीर मदरशांना टाळे ठोकण्यास सुरुवात केली आहे. पछुवा डेहराडूनमधील (Dehradun) चार मदरसे (Madrasa) टाळे ठोकण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे बांधण्यात येत असलेल्या मशिदीलाही सील करण्यात आले आहे. विकासनगर उपजिल्हा अधिकारी विनोद कुमार (Vinod Kumar) यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात अल्पसंख्याक विभाग आणि मदरसा बोर्डाचे अधिकारीही होते.
( हेही वाचा : Women’s Premier League : आरसीबीचा पराभव करत दिल्ली कॅपिटल्सची प्ले ऑफमध्ये एन्ट्री)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकीय पथकाने धाकरानी (Dhakrani) येथील मदरसा दार-ए-अक्रम, मदरसा मशिगुल रहमानिया, मदरसा फैजल उलूम आणि नवाबगड येथील दावतुल हक यांना सील केले आहे. हे मदरसे सरकारच्या परवानगीशिवाय चालू होते. मदरशांमध्ये मुलांसाठी बसण्याची मर्यादित जागा होती; वीज, पाणी आणि इतर सुविधांचाही अभाव होता. धाकरानीच्या वॉर्ड क्रमांक ११ मध्ये प्रशासकीय परवानगीशिवाय बांधण्यात येत असलेली अब्दुल बासित हदीसन मशीदीलाही प्रशासकीय पथकाने टाळे ठोकले आहे. एसडीएम विनोद कुमार यांच्या मते, जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही नवीन धार्मिक स्थळ बांधता येणार नाही किंवा जुने धार्मिक स्थळ दुरुस्त करता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. म्हणूनच या मदरशांना टाळे ठोकण्यात येत आहे. (Dehradun)
पछुवा डेहराडून (Dehradun) परिसरात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या ६० मदरशांच्या पडताळणीचा अहवाल सरकारला मिळाला. त्यांना निधी कुठून मिळतो? कोणत्या भागातील कुठली मुले इथे शिक्षण घेत आहेत? हा देखील तपासाचा विषय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) दोन दिवसांपूर्वी सहसपूरला आले होते. त्यांना येथील बेकायदेशीर मदरशांबद्दल तक्रार मिळाली होती. याशिवाय, दोन महिन्यांपूर्वीच्या प्रशासकीय पडताळणी चौकशी अहवालातही बेकायदेशीर मदरशांचे कामकाजची पुष्टी झाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे. (Dehradun)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community