Fire: मुंबईकर अग्निसंकटात; मागील दोन महिन्यांत ६५ पेक्षा अधिक आगीच्या घटना

115

Fire : मुंबई (Mumbai) शहरासह उपनगरात मागील काही दिवसांपासून आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत. या आगीच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तर मुंबईत मागील दोन महिन्यांत आगीच्या ६५ पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. जुन्या वायरिंगची न होणारी देखभाल-दुरुस्ती आणि उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे शॉर्टसर्किट (short circuit) होऊन आग लागण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती अग्निशमन विभागाने (Mumbai Fire Department) दिली आहे. (Fire)

(हेही वाचा – Bus Accident : बोलिव्हियामध्ये बस अपघातात 37 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी)

गेल्या दोन महिन्यांत मुंबई आणि उपनगरांतील उंच इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडल्या. आग लागल्यानंतर वीज पुरवठा (Power supply) खंडित केला जात असल्याने लिफ्ट बंद होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. भायखळा येथील ‘सालसेट’ (Salsette) या ५७ मजली इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर शुक्रवारी आग लागली. त्यातून रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जवानांना ४२ मजले चढावे लागले. हे अत्यंत जिकरीचे होत आहे.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : IND Vs Nz सामन्यात टीम इंडियात मोठे बदल)

अवैध बांधकामेही ठरताहेत अडसर 

अनेक निवासी सोसायट्यांमध्ये (Residential Society) अवैध बांधकामे केलेली आढळतात. तर काही इमारतींत सुरक्षेच्या कारणास्तव राखीव ठेवलेल्या मोकळ्या जागेमध्ये गोदामे थाटलेली आढळतात. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या किंवा यंत्रणा आगीच्या ठिकाणी पोहोचत नाही, आगीच्या घटना नियंत्रणात आणण्यात अडचणी येतात. परिणामी आगीची व्याप्ती वाढते आणि नुकसान होते, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.