उत्तराखंडमधील चमोली (Chamoli) येथे २८ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यंत ५४ पैकी ५० जणांना वाचवण्यात यश आले आहे, त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवार, २ मार्च या दिवशी हवामान चांगले असल्याने पहाटेच बचावकार्य सुरू करण्यात आले. सैन्य ड्रोन आणि रडार सिस्टीमचा वापर करून बर्फात अडकलेल्या कामगारांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या कारवाईत ६ हेलिकॉप्टर देखील सहभागी आहेत. (Uttarakhand Avalanche)
(हेही वाचा – Blood Donation : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समितीच्या वतीने मुलुंडमध्ये रक्तदान महायज्ञ)
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली आणि कामगारांची भेट घेतली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी बोलून बचाव कार्याचा आढावा घेतला. धामी म्हणाले की, पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
लष्कर आणि हवाई दलाव्यतिरिक्त, आयटीबीपी, बीआरओ, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे २०० हून अधिक सैनिक देखील घटनेच्या ठिकाणी बर्फ हाताने खोदून ४ बेपत्ता कामगारांचा शोध घेत आहेत.
कसा झाला अपघात ?
२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:१५ वाजता चमोलीच्या माना गावात हा अपघात झाला. मोली-बद्रीनाथ महामार्गावरील एका कंटेनर हाऊसमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (Border Road Organization, बीआरओ) चे कामगार रहात होते, तेव्हा बर्फाचा डोंगर घसरला. सर्व कामगार त्याचे बळी पडले. अपघातात अडकलेल्या ५४ कामगारांमध्ये बिहारचे ११, उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) ११, उत्तराखंडचे ११, हिमाचल प्रदेशचे ६, जम्मू-काश्मीरचे १ आणि पंजाबचे १ कामगार समाविष्ट आहेत. १३ कामगारांचा पत्ता आणि मोबाईल नंबर उपलब्ध नाही. (Uttarakhand Avalanche)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community