Pastor Bajinder Singh वर २२ वर्षीय तरुणीने केला लैगिक अत्याचाराचा आरोप

90
Pastor Bajinder Singh वर २२ वर्षीय तरुणीने केला लैगिक अत्याचाराचा आरोप
Pastor Bajinder Singh वर २२ वर्षीय तरुणीने केला लैगिक अत्याचाराचा आरोप

पंजाबमधील (Punjab) कपूरथला (Kapurthala) येथील एका २२ वर्षीय महिलेने पाद्री बजिंदर सिंह (Pastor Bajinder Singh) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, यात पीडित मुलीने सिंह यांच्यावर लैगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पंजाब (Punjab) पोलिसांनी दि. २८ फेब्रुवारी रोजी ख्रिस्ती पाद्री बजिंदरविरुद्ध लैगिक अत्याचाराचा आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला डिसेंबर २०१७ पासून पाद्री बजिंदर सिंह (Pastor Bajinder Singh) यांच्या प्रार्थना सभांना उपस्थित राहत होती.

( हेही वाचा : Dehradun मध्ये प्रशासकीय पथकाने ४ बेकायदेशीर मदरशांना टाळे ठोकले; अवैध मशिदीवरही कारवाई

पीडित महिला २०२० पर्यंत पाद्रीच्या प्रार्थना सभाचा एक भाग होती. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी सिंहने (Pastor Bajinder Singh) फोन नंबर घेतल्यानंतर, तिला अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात केली. त्यावेळी ती १७ वर्षांची होती. एफआयआरमध्ये लिहिले आहे की, “मला त्याची भीती वाटू लागली, पण मी माझ्या पालकांना सांगण्यास कचरत होतो. २०२२ मध्ये, त्यानी मला त्याच्या केबिनमध्ये बसवायला सुरुवात केली. जेव्हा मी एकटी असेन तेव्हा तो मला जबरदस्तीने मिठी मारायचा आणि घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करायचा.”

पीडितेने सांगितले की, “मी जेव्हा कॉलेजला जायचे, तेव्हा तो त्याच्या गाडीतून माझा पाठलाग करू लागला. तो मला धमकी देत ​​असे की जर मी त्याच्याशी लग्न केले नाही किंवा माझ्या पालकांना याबद्दल सांगितले नाही. तर तो माझ्या पालकांना आणि भावाला मारून टाकेल. त्यानंतर मला पॅनिक अटॅक येऊ लागले.” असेही पीडिता म्हणाली. तसेच पाद्री बजिंदर सिंह आधीच विवाहित असूनही त्याला तिच्याशी लग्न करायचे होते, असा आरोपही पीडितेने केला. (Pastor Bajinder Singh)

पीडितेचे म्हणणे आहे की, पाद्रीच्या धमक्या आणि छळामुळे तिला पॅनिक अटॅक येऊ लागले. यामुळे तिला ३ वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. पीडितेने पोलिसांना असेही सांगितले की, मार्च २०२३ मध्ये दुसरा ख्रिस्ती पाद्री राजा सिंहशी (Raja Singh) लग्न करण्यापूर्वी पाद्री बजिंदरने तिला धमकी दिली होती. त्याने त्याच्या चर्च प्रमुखांना तिच्या आईशी बोलायला सांगितले जेणेकरून तिला गप्प राहण्यास भाग पाडले जाईल. (Pastor Bajinder Singh)

पाद्री बजिंदर सिंह (Pastor Bajinder Singh) ‘चर्च ऑफ ग्लोरी अँड विस्डम’ (Church of Glory and Wisdom) चालवतात. हा पाद्री त्याच्या ‘चमत्कारिक उपचारांसाठी’ देखील ओळखला जातो. ज्याचा वापर तो लोकांना ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित करण्यासाठी करतो. जुलै २०१८ मध्ये पंजाबमधील झिरकपूर येथे एका महिलेवर बलात्कार केल्याबद्दल पाद्री बजिंदरला अटक करण्यात आली होती. त्याआधीही तो एका खून प्रकरणात तुरुंगात होता.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.