रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार? मुख्यमंत्री Devendra fadnavis म्हणाले…

72
CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते २ मार्चला ‘परिवहन भवन’चे भूमिपूजन

Devendra fadnavis : रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री (Guardian Minister) पदाचा तिडा अजुनही सुटलेला नाही. दरम्यान, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस ०२ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहे. त्यामुळे यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान, रायगडचा पालकमंत्री कोणत्या पक्षाचा असेल, या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. (Devendra fadnavis)

(हेही वाचा – Sanjay Raut यांची भूमिका दुटप्पी; शरद पवार गटाची कठोर टीका)

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रायगड (Devendra Fadnavis Raigad Visit) जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध कामाचे भूमिपूजन केले. तसेच पत्रकारांनी महाडमध्ये (Mahad) मुख्यमंत्री फडणवीस यांना रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?  रायगडचा पालकमंत्री (Guardian Minister of Raigad) कोणत्या पक्षाचा होणार असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यामुळे काही चिंता करण्याचे कारण नाही.”

(हेही वाचा – Fire: मुंबईकर अग्निसंकटात; मागील दोन महिन्यांत ६५ पेक्षा अधिक आगीच्या घटना)

मंत्री अदिती तटकरे यांची नियुक्ती केल्यानंतर स्थगिती
सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्त करण्यात आले होते. रायगडच्या पालकमंत्रिपदी मंत्री आदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. तेव्हापासून याबद्दलचा निर्णय प्रलंबित आहे. 
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी  शिवसेनेचे भरत गोगावले (Bharat Gogavle) इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मंत्रालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली होती. त्या बैठकीबद्दल शिवसेनेच्या आमदारांना सांगण्यात आले नव्हते. दरम्यान, सध्या आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यापैकी कोण पालकमंत्री होणार, असा प्रश्न जिल्ह्यातील राजकारणात चर्चिला जात आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.