दिल्लीच्या (Delhi) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) ईडीने (ED) ३ हजार ५५८ कोटी रुपये कथित घोटाळ्याचा मास्टरमाइंड सुखविंदर सिंग खरूर (Sukhwinder Singh Kharur) आणि डिंपल खरूर (Dimple Kharur) यांना अटक केली आहे. हे दोघेही आरोपी देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु लुक आऊट नोटीशीमुळे एअरपोर्टवरच दोघांना रोखण्यात आले. व्यूनाऊ मार्केटिंग सर्व्हिसेज लिमिटेड आणि त्यांच्याशी निगडीत कंपन्यांविरोधात मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत तपास सुरू आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली.
( हेही वाचा : अलीशा बनली मनीषा; Sanatana Dharma स्वीकारून केला राजेंद्रशी विवाह)
दरम्यान ईडीने सुखविंदर (Sukhwinder Singh Kharur) आणि डिंपलला (Dimple Kharur) अटक केल्यानंतर जालंधरच्या कोर्टात हजर केले. त्यानंतर कोर्टाने दोघांना ईडीची कोठडी सुनावली आहे. हा घोटाळा Cloud Partcle Scam नावाने ओळखला जातो. ज्यात गुंतवणूकदारांना खोटी प्रलोभने देत त्यांना सेल अॅन्ड लीज बँक मॉडेलच्या माध्यमातून फसवण्यात आले. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगरमध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची प्राथमिक चौकशी करताना हा प्रकार समोर आला. त्यानंतर ईडीने यावर कारवाई करत तपासात व्यूनाऊ गुपचे सीईओ सुखविंदर सिंग खरूर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून हा घोटाळा केल्याचं उघड झालं.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, क्लाउड पार्टिकल टेक्नोलॉजीच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम घेण्यात आली.परंतु त्यांचा खरा व्यापार तो नव्हताच. गुंतवणूकदारांना प्रलोभने दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली. या बनावट गुंतवणूक योजनेत जवळपास ३५५८ कोटी रूपये हडप करण्यात आल्याचा आरोप आहे. घोटाळ्यातून मिळालेला पैसा कमिशन, महागड्या कार, सोने, हिरे, शेल कंपन्यात वापरण्यात आला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community