CM Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, हिंदूंना मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून नाही तर डाव्या उदारमतवाद्यांपासून जास्त धोका आहे. (CM Himanta Biswa Sarma)
जनतेला संबोधित करताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, ‘जेव्हा मी काही लोकांचे भाषण ऐकतो तेव्हा त्यांना वाटते की भारताची सुरुवात संविधान स्वीकारल्यापासून झाली, पण तसे अजिबात नाही. भारतीय संस्कृती ५००० वर्षे जुनी आहे आहे. हिंदू धर्माचा नाश करण्याची प्रतिज्ञा करणारा औरंगजेब तो नष्ट करू शकला नाही. पण ते स्वतःहून संपले. जर राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना वाटत असेल की हिंदूंचा नाश होईल, तर मी म्हणेन की तुम्ही सर्वांचा नाश कराल पण हिंदू धर्म कधीही नाश होणार नाही.
(हेही वाचा – Uttarakhand Avalanche : उत्तराखंड हिमस्खलन, ४ जणांचा शोध सुरू; ५० कामगारांना वाचवण्यात यश)
‘हिंदूंना मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून धोका नाही’
डाव्या (Leftist people) आणि उदारमतवादी (liberal) लोकांनी या देशाला विळखा घातला आहे. अशा लोकांना पद्मश्री मिळाले, जे विशेषतः हिंदूंच्या विरोधात बोलायचे. देश सावरणार नाही, असे 2014 पर्यंत वाटायचे. अनेक घोटाळे झाले, हिंदूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यावेळी हिंदू बोलू नका, धर्मनिरपेक्ष बोला, असे सांगितले गेले. देशाच्या पंतप्रधानांनी तर देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क असेल, असे म्हटले होते. खर तर हिंदूंना मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून (Christian) धोका नाही, तर हिंदूंना धोका आपल्या समाजापासूनच आहे.
‘डाव्या आणि उदारमतवादी लोकांपासून धोका आहे’
मला वाटतं की आपल्यासाठी सर्वात मोठा धोका डाव्या आणि उदारमतवादी लोकांपासून आहे. आज बंगालची हीच अवस्था आहे. येथे हिंदू कमकुवत झाले. ममता बॅनर्जी यांना हे वारसा म्हणून मिळाले, पण डावे आणि उदारमतवादी यासाठी जबाबदार आहेत. जोपर्यंत भारतात हिंदू सुरक्षित राहतील तोपर्यंत इतर धर्मही सुरक्षित राहतील असा माझा नेहमीच विश्वास आहे.
(हेही वाचा – केंद्रीय मंत्री Raksha Khadse यांच्या मुलीची छेडछाड काढणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संताप)
यूसीसी येण्याची चिन्हे आहेत: सीएम शर्मा
हिमंता बिस्वा सरमा असेही म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान (PM Narendra Modi) झाल्यानंतर एक वेळ अशी आली की वक्फ (Waqf) संपणार आहे असे वाटले. तिहेरी तलाक देखील संपला आहे आणि आता आपल्या देशात यूसीसी (UCC Act) येण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community