“… पण मला जिवंत सोड” ; Pune Swargate bus depot प्रकरणात ‘या’ एका कारणासाठी तरुणीने प्रतिकार केला नाही

258
"... पण मला जिवंत सोड" ; Pune Swargate bus depot प्रकरणात 'या' एका कारणासाठी तरुणीने प्रतिकार केला नाही

स्वारगेट एसटी आगारात (Pune Swargate bus depot) दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याने तरुणीने तिच्या मर्जीने आपल्याशी शरीरसंबंध (Pune Rape) ठेवल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात ही तरुणी जीवाच्या भीतीने गप्प राहिली आणि तिने आरडाओरडा केला नसल्याची माहिती पोलिसांच्या (Pune Police) तपासातून समोर आली आहे. मी तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यासाठी पैसे दिले होते, असा दावा दत्तात्रय गाडे याच्याकडून केला जात आहे. या सगळ्यात दत्तात्रय गाडे याच्या बायकोसह त्याचे कुटुंब त्याला साथ देत आहे. (Pune Swargate bus depot)

तरुणीने खाली उतरण्याचा प्रयत्न केला मात्र…
अत्याचारावेळी दत्तात्रय गाडे याने आपल्याला जिवंत सोडावे, या एका कारणासाठी तरुणीने प्रतिकार केला नाही. दत्तात्रय गाडे हा आपण कंडक्टर असल्याचे सांगत शिवशाही बसमध्ये घेऊन गेला. त्यानंतर दत्तात्रय गाडे याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नसल्याचे पाहून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दत्तात्रय गाडे याने तिला सीटवर ढकलून दिले. पिडीत तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, बसच्या काचा बंद असल्याने आवाज बाहेर आला नाही. त्यानंतर दत्तात्रय गाडे याने पीडितेचा गळा दाबला. त्यामुळे ही तरुणी प्रचंड घाबरली. आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी ही तरुणी दत्तात्रय गाडे याच्याकडे याचना करु लागली. याचाच फायदा घेऊन दत्तात्रय गाडे याने तरुणीवर अत्याचार केले. या तरुणीला कोणत्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता. पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर पीडिता घाबरली आहे, ती फार प्रतिकार करत नाही, ही गोष्ट दत्तात्रय गाडे याच्या लक्षात आली. तेव्हा नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तरुणी प्रचंड घाबरली होती. तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना दत्तात्रय गाडे याच्याकडे केली. त्यामुळे दत्तात्रय गाडे याचे काम सोपे झाले. (Pune Swargate bus depot)

यापूर्वीही बलात्काराचा प्रयत्न
गाडे याने यापूर्वीही एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मात्र, संबंधित महिलेनेही घाबरुन हे प्रकरण फार पुढे नेले नाही. या पीडितेने दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध केवळ चोरीची तक्रार दिली होती. दत्तात्रय गाडे हा दिवसभर गावामध्ये थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्टँडवर महिला सावज हेरायचा अशी कबुली त्याने यापूर्वी पोलिसांना दिली आहे. यापूर्वी ही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून त्याला स्वारगेट स्टँडवरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. (Pune Swargate bus depot)

पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
दत्तात्रय गाडे याने वकिलांमार्फत आपण पीडित तरुणीला महिनाभरापासून ओळखत होतो, असाही दावा केला होता. त्यामुळे या दोघांच्या फोन कॉलची चौकशी व्हावी, अशी मागणी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी केली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर त्याच्या आणि पीडितेच्या मोबाईलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासले आहेत. यामध्ये कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आलेले नाही. (Pune Swargate bus depot)

पीडित तरुणी कधीच दत्तात्रय गाडे याच्या संपर्कात नव्हती, हे स्पष्ट
आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बँक खात्यात बलात्काराच्या घटनेपूर्वी फक्त 249 रुपये शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी दावा केल्याप्रमाणे तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यासाठी जे 7500 रुपये देण्यात आले, ते पैसे कुठून आले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुन्हा घडल्यानंतर दत्तात्रय गाडे याने आपला मोबाईल बंद केला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेऊन त्याचे बँक खाते, डिजिटल व्यवहार, ऑनलाईन पेमेंट या सगळ्याची सखोल चौकशी केली. दत्तात्रय गाडे याच्या मोबाईलमधून कोणाकोणाला पैसे ट्रान्सफर करण्यात आले? संबंधित तरुणीला पैसे देण्यात आले का? या सगळ्याचा तपास पोलिसांनी केला. मात्र, पीडित तरुणी कधीच दत्तात्रय गाडे याच्या संपर्कात नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. तसेच दत्तात्रय गाडे तरुणीला 7500 रुपये दिल्याचा जो दावा करत आहे, तोदेखील फोल ठरला आहे. कारण या घटनेपूर्वी दत्तात्रय गाडे याच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये शिल्लक होते. (Pune Swargate bus depot)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.