पहिल्या खासगी यानाचे चंद्रावर पाऊल; नासाच्या सहकार्याने Firefly Aerospace ची यशस्वी मोहिम

98
पहिल्या खासगी यानाचे चंद्रावर पाऊल; नासाच्या सहकार्याने Firefly Aerospace ची यशस्वी मोहिम
पहिल्या खासगी यानाचे चंद्रावर पाऊल; नासाच्या सहकार्याने Firefly Aerospace ची यशस्वी मोहिम

अमेरिकेतील (America) नासाचे विविध प्रयोग साहित्य घेऊन ‘ब्लू घोस्ट’ (Blue Ghost) हे अवकाशयान दि. २ मार्च रोजी चंद्रावर यशस्वीपणे उतरले आहे. ‘फायरफ्लाय एअरोस्पेस’ कंपनीचे हे अवकाशयान असून ‘ब्लू घोस्ट’ हे चंद्रावर उतरणारे पहिले खासगी आणि केवळ दुसरे व्यावयायिक यान आहे. ‘ब्लू घोस्ट’ (Blue Ghost) यान चंद्रावर यशस्वीपणे उतरल्याने अवकाश क्षेत्रामध्ये व्यावसायिक शोधामध्ये मोठी झेप म्हणून या प्रयोगाकडे पाहिले जात आहे. (Firefly Aerospace)

( हेही वाचा : उपराष्ट्रपती Jagdeep Dhankhar यांचे धर्मांतराबद्दल महत्त्वाचे वक्तव्य; म्हणाले, आर्थिक प्रलोभन दाखवून धर्मांतराचा कट..

फ्लोरिडा येथून दि. १५ जानेवारीला ‘ब्लू घोस्ट’ (Blue Ghost) या खासगी यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. ते चंद्रावरील कक्षेतून स्वयंचलित तंत्राद्वारे ते चंद्रावर यशस्वीपणे (सॉफ्ट लँडिग) उतरले. लँडर यशस्वीपणे चंद्रावर उतरल्याची फायरफ्लाय एअरोस्पेसच्या (Firefly Aerospace) टेक्सास (Texas) येथील नियंत्रक कक्षाकडून पुष्टी करण्यात आली.

‘ब्लू घोस्ट’च्या (Blue Ghost) प्रक्षेपणासाठी १०.१ कोटी डॉलर तर, यानातील तंत्रज्ञानातील ४.४ कोटी डॉलर खर्च आला. चंद्रावर अवकाशयान यशस्वीपणे उतरवणारी फायरफ्लाय ही पहिली खासगी कंपनी ठरली आहे. पृथ्वीवरून दिसणारे चंद्रावरील प्रचंड मोठ्या विवरांचा शोध घेणे हा या मोहिमेचा हेतू आहे. नासा आणि खासगी कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमांपैकी अगदी अलिकडील उपक्रम म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे. आतापर्यंत भारत, रशिया, चीन (China) आणि जपानने (Japan) चंद्रावर अवकाशयान सुरळीतरित्या उतरविले आहे. (Firefly Aerospace)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.