नाशिक- त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar ) येथे २०२७ ला होणाऱ्या कुंभ (Kumbha) मेळ्याच्या निमित्ताने महंत आचार्य पीठाधीश्वर अनिकेतशास्त्री महाराज यांनी अखिल भारतीय संत समितीद्वारे (Akhil Bharatiya Sant Samiti ) सरकार आणि प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. यातील महत्त्वाची सूचना म्हणजे, कुंभमेळ्याचे मुख्य यजमान म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिकचे पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारावे, असे अनिकेतशास्त्री महाराज (Mahant Aniketshastri Maharaj ) म्हणाले.
( हेही वाचा : “… पण मला जिवंत सोड” ; Pune Swargate bus depot प्रकरणात ‘या’ एका कारणासाठी तरुणीने प्रतिकार केला नाही)
दरम्यान कुंभासाठी कायमस्वरूपी शासनाने साधूग्रामसाठी नाशिकमध्ये (Nashik) किमान ५०० एकर व त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar ) किमान ३०० एकर जागा भूमीअधिग्रहण करावी. तसेच जमीन मालकांना मार्केट रेटनुसार अधिकाधिक मोबदला द्यावा. शेतकऱ्यांचे भूमीधारकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना अनिकेतशास्त्री महाराजांनी केली आहे. त्याचबरोबर कुंभमेळा प्राधिकरण लवकरात लवकर स्थापन होणे गरजेचे आहे आणि प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांबरोबर शैव व वैष्णव १३ आखाड्यांचे प्रतिनिधी आखाडा परिषद, अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज, स्थानिक साधु-संत-महंत, पुरोहित संघ, धर्मशास्त्र अभ्यासक धर्माचार्य, वारकरी व इतिहास तज्ञ आदींचा समावेश करून घ्यावा, असेही अनिकेतशास्त्री महाराज (Mahant Aniketshastri Maharaj ) म्हणाले.
महंत आचार्य पीठाधीश्वर अनिकेतशास्त्री महाराजांनी केलेल्या अन्य सूचना
– साधूग्राम मध्ये साधुसंत महंतांच्या दशनामी आखाड्यांव्यतिरिक्त इतर सर्व सनातन धर्म रक्षक संस्था, कथावाचक तसेच अन्यान्न संप्रदाय आदींची वेगळी नियोजनबद्ध व्यवस्था सरकारने करावी.
– नाशिक-त्र्यंबकेश्वर तसेच जिल्ह्यातील सर्व रजिस्टर आखाडे, मंदिरे, धार्मिक संस्था, धर्मशाळा, चारिटेबल ट्रस्ट आधी सर्व ठिकाणी प्रशासनाने साधुसंत तसेच भाविक-भक्त जे सर्व देशभरातून येणार आहेत त्यांच्या राहण्यायोग्य प्राथमिक गरजा सुख-सुविधा उपलब्ध करून देणे. शहरातील सर्व मठ मंदिरांचे सुशोभीकरण करावे.
– सुमारे २५ ते ३० कोटी लोक कुंभला नाशिकमध्ये जगभरातून येणार असा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार गोदावरी नदी प्रभावित नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या चतु:सीमा चारही बाजूंनी जनतेसाठी इतर घाटांवर अमृत कुंभस्नानाची उत्तम व्यवस्था करावी, जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होऊन दुर्घटना होणार नाही, कुंभमेळ्याला गालबोट लागणार नाही.
– साधूंच्या अमृतकुंभ पर्वणी स्नानाच्या दिवशी एक दिवस अगोदरच जनतेचा प्रवेश बंद करावा. तसेच महास्नान व साधुसंतांच्या दिव्य दर्शनासाठी संपूर्ण शहरात विविध ठिकाणी स्क्रीन उभारावेत. शहरांमध्ये जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. पेशवाई व अमृतकुंभस्नान मार्गातील सर्व अतिक्रमण तत्काळ हटवावीत.
– जगभरातून येणाऱ्या भक्तांची यात्रा सफल व्हावी, यासाठी अमृत महाकुंभाचा इतिहास, स्नानासाठी अन्य घाटांची माहिती, शहरातील मुख्य आकर्षणे, पर्यटन स्थळे, अधिकृत हॉटेल रिसॉर्ट, धर्मशाळा, प्रमुख मंदिरे यांचे गुगल मॅप तसेच अत्यावश्यक यंत्रणेचे संपर्क नंबर उदाहरणार्थ: हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, फायर ब्रिगेड आदि सर्व माहिती उपलब्ध होईल असे APP. एप्लीकेशन महाराष्ट्र सरकारने बनवावे.
– जगभरातून येणाऱ्या भाविकांची फसवणूक होऊ नये व कुंभमेळ्याची शहराची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भाषांचे कॉल सेंटर उभारावे. सरकारचा कुंभमेळासाठी टोल फ्री नंबर जनतेला जाहीर करावा.
– भारतातील मुख्य शहरातून कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्रंबकेश्वर येथे पोहोचण्यासाठी हवाई मार्ग, रेल्वे मार्ग, राज मार्ग रोड रस्ते, आदि कनेक्टिव्हिटी माहितीपत्रक प्रसिद्ध करावे. उदाहरणार्थ: दिल्ली पासून, तसेच मुंबईपासून, इंदोर पासून, अहमदाबाद पासून, लखनऊ पासून, भोपाळ पासून, रायपूर पासून, चेन्नई पासून, बेंगलोर पासून, कोलकत्ता पासून, अमृतसर पासून, जयपूर पासून आदी आदी सर्व महत्त्वाच्या शहरापासून नाशिक-त्रंबकेश्वर या तिनही मार्गाद्वारे एयर, रेल्वे व रोडच्या माध्यमातून कसे पोहोचता येईल व किती किलोमीटर आहे अशी सुलभ सर्व माहिती प्रसिद्ध करावी.
– रेल्वे मंत्रालयाने नाशिक-त्र्यंबकेश्वर महाकुंभासाठी स्पेशल ट्रेन सुरू करावी. तसेच त्र्यंबकेश्वर येथे रेल्वे स्टेशन बनवावे व नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म सध्या चार आहेत, ते वाढवून आठ करावे.
– प्रायव्हेट टेन्ट सिटी राहण्याच्या व्यवस्थांच्या निर्माण कार्यासाठी MTDC यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोत्साहन मिळावे.
– महाकुंभात येताना नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी व कोणकोणत्या अत्यावश्यक गोष्टी जवळ बाळगाव्या याची यादी सरकारने जाहीर करावी. उदाहरणार्थ: नाशिक-त्रंबकेश्वर कुंभमेळा हा पावसाळ्यात सुरू होतो त्यासाठी छत्री, रेनकोट तसेच आजारी असल्यास मेडिकल रिपोर्ट, आधार कार्ड, लहान व वृद्ध लोकांसाठी हातातील बँड टॅग, औषधे अशा अत्यावश्यक गोष्टींची सूची जाहीर करावी.
– त्याचबरोबर “हरवले व सापडले” सहाय्यता केंद्र उभारावीत. महिलांसाठी घाटांवर चेंजिंग रूम उभारावेत. टॉयलेट बाथरूम जास्तीत जास्त उभारावीत.
– कुशावर्त कुंड व रामकुंड तसेच अन्य स्नानाच्या घाटांवर तत्काळ फिल्टर प्लांट, पाणी शुद्धीकरण यंत्र लावावीत. गोदावरी नदीत कोणतेही रसायन युक्त पाणी, सांडपाणी सोडू नये.
– जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सामाजिक संस्थानांना स्वयंसेवेसाठी आवाहन करावे स्वयंसेवक जास्तीत जास्त निर्माण करून त्यांना ट्रेनिंग द्यावे.
– सनातन हिंदू धर्माव्यतिरिक्त भारतात आक्रांते म्हणून जे अन्य धर्मीय आहेत. ज्यांना सनातन हिंदू धर्माशी संस्कृतीशी काडीमात्र संबंध नाही. हिंदू संस्कृतीच्या विनाशासाठी ज्या धर्माने कायम कार्य केले, त्यांच्या मजहबनुसार अन्य धर्मीय हे काफीर आहेत. अशी दुष्ट मानसिकता जिहादी प्रवृत्तीच्या धर्मीयांना उदाहरणार्थ: मुस्लिम-ख्रिश्चन आदिंना महाकुंभमेळा परिक्षेत्रात व्यवसायासाठी प्रवेश बंद करावा. सर्व हिंदू दुकानदारांनी “ॐ सर्टिफिकेट” घ्यावे.
– येण्या जाण्याचे मार्ग निश्चित करावे तसे फलक एन्ट्री व एक्झिट कसे असणार याप्रमाणे लावावेत.
– नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील परंपरागत पुरोहित संघाच्या अतिप्राचीन गोदावरी महाआरतीचा जगभरात प्रचार व प्रसार व्हावा यासाठी योग्य ते शासनाने नियोजन करावे.
– महाकुंभामध्ये साधुसंतांच्या महास्नानाला इथून पुढे “शाहीस्नान” म्हणून संबोधू नये. “महाकुंभ अमृतस्नान पर्वस्नान” संबोधावे.
– साधू संतांशी व्यवहार करताना युट्यूबर व अन्य प्रचार संस्थांना नियमावली बनवावी. ज्याप्रमाणे मंत्रालय, न्यायालय, हॉस्पिटल, शाळा, आदि ठिकाणी सुयोग्य नियमावली पाळतो त्याचप्रमाणे साधू संतांच्या आखाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर नियमावली पाळावी साधुसंतांची तपश्चर्या, साधना, अनुष्ठान, सिद्धी, भारतीय संस्कृती, वेद-वेदांग, पुराण, उपनिषद, धर्मशास्त्र आदींमध्ये दिव्यज्ञान जगासमोर येईल याची खबरदारी सर्वांनी बाळगावी. जे कोणी याचे उल्लंघन करेल त्या व्यक्तीवर, संस्थेवर शासनाने कठोर कारवाई करावी जेणेकरून सनातन वैदिक हिंदू धर्माचा अपप्रचार होणार नाही.
– जनतेमधून VIP दर्शन पद्धत बंद करावी त्यासाठी VIP प्रशासकीय वेगळे मार्ग बनवावेत, हिंदू जनतेची श्रद्धा व भावना दुखावणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी.
– अमृत महाकुंभासाठी जगभरातून साधुसंत, भाविक-भक्त जेव्हा येतील. त्याचबरोबर नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या २०० ते ३०० किलोमीटर परिक्षेत्रातील ऐतिहासिक पौराणिक तीर्थ क्षेत्र, ज्योतिर्लिंग व धार्मिक क्षेत्रांच्या यात्रेला जातील त्यासाठी त्या सर्व धार्मिक स्थळांची यादी जाहीर करून तेथे पोहोचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना अखिल भारतीय संत समिती,धर्म समाज, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांनी केली.