कर्नाटक काँग्रेसमध्ये (Congress) सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांच्यात मुख्यमंत्री पदावरून खडाजंगी सुरु आहे. राजकीय तणावामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते वीरप्पा मोइली यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, डीके शिवकुमार यांना राज्याचा पुढचा मुख्यमंत्री बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ते पुढे म्हणाले की, यासंदर्भात कोणाताही मतभेद असू नये कारण मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे येणार हे निश्चित होते.
( हेही वाचा : World Wildlife Day: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गीर राष्ट्रीय उद्यानात केली सफारी)
वीरप्पा मोइली काय म्हणाले?
करकलामध्ये (Karkala) काँग्रेसच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोइली म्हणाले की, माझ्यामुळे डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांना निवडणुक लढवण्यासाठी तिकीट देण्यात आले. आज कर्नाटकातील प्रतिष्ठीत राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे आपण लवकर त्यांना मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यासाठी प्रार्थना करूया. ते पुढे म्हणाले की, कर्नाटक प्रदेश काँग्रेस (Congress) कमेटी अध्यक्ष असून डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. राज्यात पक्षाची सत्ता येण्यामागेही त्यांचे योगदान आहे.
शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही
शिवकुमार यांच्या नेतृत्वात संघटनकौशल्याचे कौतुक करत केंद्रीय मंत्री मोइली म्हणाले की, कोणी काहीही म्हणाले तरी डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांना मुख्यमंत्री बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे मुख्यमंत्री पद कोणालाही गिफ्ट म्हणून मिळालेले नाही, काहींनी तर स्वता:हून या पदावर आपला दावा ठोकला आहे, अशी टीका ही मोइली यांनी केली. (Congress)
राज्यातील राजकीय वातावरण पाहता, सत्ताधारी काँग्रेस (Congress) पक्षात या वर्षाच्या शेवटी नेतृत्व परिवर्तनासंदर्भात चर्चा केली होती. ज्यात अडीज- अडीज वर्ष मुख्यमंत्री पद असा अघोषित नियम ठरवण्यात आल्याची चर्चा होती. शिवकुमार (DK Shivakumar) सध्या काँग्रेस अध्यक्ष पदाचा कारभार सांभळत आहेत. तसेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जातात.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community