Jordan च्या सैन्याने कारवाईदरम्यान केलेल्या गोळीबारात भारतीय नागरिकाचा मृत्यू

62
Jordan च्या सैन्याने कारवाईदरम्यान केलेल्या गोळीबारात भारतीय नागरिकाचा मृत्यू

जॉर्डनच्या लष्कराने एका भारतीय नागरिकाची हत्या केली आहे. जॉर्डन-इस्रायल सीमेवर भारतीय नागरिकावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मृतकाचे नाव अ‍ॅनी थॉमस गॅब्रिएल (४७) असे असून ते केरळमधील थुंबा येथील रहिवासी होते. जॉर्डनमधील भारतीय दूतावासाने रविवारी (दि.२) एका भारतीय नागरिकाचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती दिली. (Jordan)

(हेही वाचा – Karnataka काँग्रेसमध्ये संघर्ष कायम; सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या वादाचे नेमके कारण काय?)

या गोळीबारात गॅब्रिएलचा नातेवाईक एडिसनही जखमी झाला आहे. 5 फेब्रुवारी रोजी गॅब्रिएल तामिळनाडूतील वेलंकन्नी या ख्रिश्चन धार्मिक स्थळी जाण्याच्या उद्देशाने निघाले होते. एका एजंटच्या मदतीने ते जॉर्डनहून इस्रायलची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. दूतावास मृताच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. तर मृत गॅब्रिएलच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे की, त्यांना १ मार्च रोजी भारतीय दूतावासाकडून अ‍ॅनी थॉमस गॅब्रिएलच्या मृत्यूची पुष्टी करणारा ई-मेल मिळाला आहे. (Jordan)

(हेही वाचा – World Wildlife Day: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गीर राष्ट्रीय उद्यानात केली सफारी)

माहितीनुसार, ही घटना १० फेब्रुवारी रोजी घडली जेव्हा जॉर्डनच्या सैनिकांनी सीमेवर गोळीबार केला. गॅब्रिएलचा नातेवाईक एडिसन यालाही गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. तथापि, तो वाचला असून जखमी अवस्थेत घरी परतल्याचे त्यांनी सांगितले. (Jordan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.