-
खास प्रतिनिधी
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, ३ मार्च २०२५, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
(हेही वाचा – Karnataka काँग्रेसमध्ये संघर्ष कायम; सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या वादाचे नेमके कारण काय?)
सकाळचा भोंगा
महायुती सरकारवर रोज सकाळी टीका करणारे आणि ज्यांना महायुती नेते सकाळचा भोंगा म्हणून संबोधतात त्या संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाला शिवसेना उबाठा आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवडले.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : खराब फलंदाजीनंतर आता KL Rahul च्या यष्टीरक्षणावर प्रश्नचिन्ह !)
अन्य तालिका अध्यक्ष
राऊत यांच्याव्यतिरिक्त आमदार योगेश सागर, संजय केळकर, बबनराव लोणीकर, रमेश बोरणारे, दिलीप बनकर, बापुसाहेब पठारे आणि अमित झनक यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड केल्याचे नार्वेकर यांनी जाहीर केले.
ज्यावेळी विषबाधा अध्यक्ष काही महत्त्वाच्या बैठकीत किंवा कार्यक्रमात व्यस्त असतात अशा वेळी सभागृहाचे कामकाज तालिका अध्यक्ष हाताळतात. या तालिका अध्यक्षांच्या पंक्तित सुनील राऊत (Sunil Raut) यांचे नाव आल्याने आमदारांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community