Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारी आणि मार्चचा हफ्ता कधी मिळणार ? आदिती तटकरेंनी केले स्पष्ट

97

महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mazi Ladki Bahin Yojana) योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत करत आहे जाते. या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. आता मार्च महिनाही आला असल्यामुळे दोन्ही महिन्यांचे पैसे कधी मिळणार याची विचारणा केली जात आहे. याविषयी महिला आणि बालकल्याणमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माहिती दिली आहे.

(हेही वाचा – जगभरातील ४० टक्के विद्यार्थी मातृभाषेपासून वंचित; Global Education Monitoring पथकाच्या अहवालाचा निष्कर्ष)

आदिती तटकरे यांची विरोधकांवर टीका

आदिती तटकरे (Aditi Tatkare) मुंबईत माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना म्हणाल्या, “याआधी २ कोटी 25 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्याही लाभार्थी तेवढ्याच असतील. गेल्या चार ते पाच महिन्यांत महिलांचा या योजनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता हा महिला दिनाच्या (women’s day 2025) पूर्वसंध्येला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, तर मार्च महिन्याचा हफ्ता हा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात टाकला जाईल.

विरोधकांमध्ये या योजनेबाबत नैराश्य आलेलं आहे. हेच नैराश्य ते लाडक्या बहि‍णींमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांना सुरुवातीपासूनच ही योजना खुपते आहे, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. (Mazi Ladki Bahin Yojana)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.