Israel Hamas War : इस्रायलने गाझापट्टीतील सर्व मदत थांबवली

53

युद्धामुळे विस्थापित झालेल्या गाझापट्टीवरील नागरिकांसाठी पाठवण्यात येणारी सर्व प्रकारची मदत आणि पुरवठा रविवार, २ मार्च या दिवशी इस्रायलकडून थांबविण्यात आला. इस्रायल-हमास युद्धबंदीचा (Israel-Hamas ceasefire) पहिला टप्पा शनिवारी संपला. यात वाढीव मानवतावादी मदतीचा देखील समावेश होता. दोन्ही पक्षांमध्ये अद्याप दुसऱ्या टप्प्यातील चर्चेला सुरुवात झालेली नाही. (Israel Hamas War)

(हेही वाचा – Road Accident: राज्यात रस्ते अपघाताची मालिका सुरूच; गेल्या ९ वर्षातील धक्कादायक आकडेवारी आली समोर)

गाझातील इस्रायल (Israel) सैन्याची माघार व त्या बदल्यात डझनहून अधिक ओलिसांची सुटका यासंदर्भात दुसऱ्या टप्प्यात चर्चा होणार होती. त्याआधीच सर्व मदत बंद करून युद्धबंदीच्या विस्तारासाठीचा नवीन प्रस्ताव स्वीकारला नाही, तर अतिरिक्त परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इस्रायल सरकारने हमासला दिला.

पहिल्या टप्प्यातील अडथळे

शस्त्रसंधीच्या पहिल्या टप्प्यात हमासने त्यांच्या ताब्यातील अपहृतांपैकी २५ जणांची सुटका केली असून मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांचे मृतदेहही इस्राईलकडे सुपूर्द केले आहेत. त्याबदल्यात इस्रायलने दोन हजार पॅलेस्टिनी (Palestinian) नागरिकांची सुटका केली आहे. मात्र, या सहा आठवड्यांच्या कालावधीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शस्त्रसंधी भंगाचा आरोप ठेवत तणाव निर्माण केला होता. इस्रायलने काही वेळा केलेल्या हवाई हल्ल्यात १५ ते २० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. (Israel Hamas War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.