Aligarh Muslim University च्या परिसरात दोन गटात हाणामारी; एका विद्यार्थ्याचा मृत्यू

70
Aligarh Muslim University च्या परिसरात दोन गटात हाणामारी; एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Aligarh Muslim University च्या परिसरात दोन गटात हाणामारी; एका विद्यार्थ्याचा मृत्यू

AMU Shooting: अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या (Aligarh Muslim University) परिसरात दि. २८ फेब्रुवारी रोजी ११ वीच्या विद्यार्थ्यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. हे प्रकरण सोशल मीडियावरील रिल आणि त्यावर करण्यात आलेल्या कॅमेटशी संबंधित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्यांचे नाव मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) असे आहे. तो अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील (Aligarh Muslim University) एक कर्मचारी सैय्यद हामिदसोबत (Saiyid Hamid) उच्च माध्यमिक वर्गात शिकत होता. मोहम्मद कैफ याची विद्यार्थ्यांच्या भांडणात चाकू भोसकून हत्या करण्यात आली.

( हेही वाचा : Jordan च्या सैन्याने कारवाईदरम्यान केलेल्या गोळीबारात भारतीय नागरिकाचा मृत्यू

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही गटांमध्ये झालेला वाद हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रिलशी संबंधात होता. काहींनी रिलवर केलेल्या कॅमेटमुळे हा वाद झाला. अलीगढ पोलीस ठाण्यात शोएब, अयान उर्फ प्रिंस, फराज आणि मजहरच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९१ (२), १९१ (३), १९०, ६१, १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीगढ पोलिस अधीक्षक मृगांक शेखर पाठक (Mrigank Shekhar Pathak) यांनी सांगितले की, याप्रकरणी एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच आरोपींना लवकर अटक करण्यात येईल, असेही पाठक म्हणाले.

जखमी विद्यार्थ्यांवर जेएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु
ही घटना अलीगढ (Aligarh) शहराच्या जमालपुर (Jamalpur) परिसरात घडली. जखमी विद्यार्थ्यांना जेएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कैफचे वडील मोहम्मद नईम हे एएमयूमध्ये ट्यूबवेल ऑपरेटर म्हणून काम करतात. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांचा मुलगा आणि त्याचा मित्र दुपारी ३ वाजता मोटरसाइकलवरून घरातून निघाले होते. तेव्हा एबीके युनियन पब्लिक स्कूलजवळ उभे असताना दुसऱ्या गटाच्या विद्यार्थ्यांनी कैफवर हल्ला करत हत्या केली. (Aligarh Muslim University)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.