महाराष्ट्रामध्ये गेल्या नऊ वर्षांत रस्ते अपघातांमध्ये (road accident) मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. २०१६ ते २०२४ या काळात झालेल्या अपघातांमध्ये तब्बल १,२२,२७० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती अधिकारातून समोर आली आहे. याशिवाय, २,५८,७२३ लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. रस्ते अपघात (Accident) रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी, अपघातांची संख्या कमी होताना दिसत नाही. (Road Accident)
अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांना शिस्त लावण्याच्या नावाखाली नियम तोडणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलीस, आरटीओ (RTO) यांच्याकडून कारवाईचा धडाका लावला जातो; परंतु अपघातांना कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील परिस्थिती मात्र सर्वांकडूनच दुर्लक्षित असते. यावरून अनेकदा वाहनचालकांकडून टीकादेखील होत असते. भरधाव वाहनापुढे अचानक आलेला खड्डा, रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमुळे किंवा भरधाव वाहनाने धडक दिल्याने अपघात घडत असतात. त्यापैकी किरकोळ अपघातांची (Minor accidents) नोंद होत नाही. मात्र, गंभीर अपघातांची स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद होते. त्यानुसार २०१६ ते २०२४ सालामधील अपघातांची संख्या माहिती अधिकारातून पुढे आली आहे. त्यावरून राज्यभरात नऊ वर्षात ३ लाख ३ हजार ५३१ अपघातांमध्ये १ लाख २२ हजार २७० जणांचे बळी गेल्याची बाब समोर आली आहे. त्याशिवाय २ लाख ५८ हजार ७२३ जखमी थोडक्यात मृत्यूच्या दाढेतून बचावले आहेत.
(हेही वाचा – Jordan च्या सैन्याने कारवाईदरम्यान केलेल्या गोळीबारात भारतीय नागरिकाचा मृत्यू)
सोलापूर शहरात कमी अपघात
अपघातांमध्ये राज्यात पुढे असलेल्या मुंबईत (Mumbai) २३,५१९ अपघातांत ३८०२ जणांचे बळी गेले आहेत, तर सोलापूर शहरात सर्वांत कमी (१९२५) अपघात झाले असून, ६९४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय अपघातांमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या पुण्यात अपघाती मृत्यूचे प्रमाण मात्र राज्यात सर्वाधिक (८३९९) आहे, तर सिंधुदुर्गात १९८२ अपघातांमध्ये ६५२ बळी गेले आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community