अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली. या भेटीदरम्यान एक महत्त्वाचा खनिज करार होईल आणि रशियाच्या आक्रमणाचा अंत करण्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा वाढेल अशी आशा जगाला या भेटीमधून होती. मात्र, या भेटीत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. दोन्ही नेत्यांमधील बैठकीची सुरुवात औपचारिक बैठकीने झाली. पुढे ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या अनौपचारिक संभाषणाचे रूपांतर लवकरच जोरदार वादविवादात झाले. जेव्हा ट्रम्प आणि झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये भेटले, तेव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स देखील उपस्थित होते. (Donald Trump Volodymyr Zelenskyy)