देशातल्या सर्वांत उंच धबधब्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा दूधसागर धबधबा हा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा पाहताना निसर्गाच्या अफाट शक्तीचा साक्षात्कार होतो. ३१० मीटर एवढ्या उंचीवरून खाली उतरणारा हा दूधसागर धबधबा भारतातल्या सर्वांत उंच धबधब्यांपैकी एक आहे.
दूधसागर धबधब्याकडे जाणारा मार्ग हा हिरव्यागार घनदाट जंगलातून जातो. या ट्रेकची आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे, दूधसागर धबधब्याकडे जाण्यासाठी एका रेल्वे लाईनच्या बोगद्यातून जावं लागतं आणि ही रेल्वे लाईन सक्रिय आहे. गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेला हा रेल्वे लाईनचा हा भाग पश्चिम घाटाचा एक भाग आहे. इथल्या जंगलांमध्ये वनस्पती आणि प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या मार्गावरून जाताना आजूबाजूच्या जंगलातली आश्चर्यकारक दृश्ये दिसतात. त्यामुळे हा ट्रेक अधिकच रोमांचक होतो. (dudhsagar falls trek)
(हेही वाचा – Budget Session मध्ये ६ हजार ४८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर)
दूधसागर धबधब्याकडे जाणारा मार्ग
दूधसागर धबधब्याच्या ट्रेकला जाणारा मार्ग हा फार कठीण नसला तरी रेल्वे लाईनवरून किंवा लाईनच्या शेजारी चालताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागते. कारण की, ही रेल्वे लाईन सक्रिय आहे. म्हणून या रस्त्याने चालताना सावधगिरीनेच चालणं शहाणपणाचं ठरतं.
दूधसागर धबधब्याचा ट्रेक हा कॅसल रॉक रेल्वे स्थानकापासून सुरू होतो. आश्चर्याची गोष्ट अशी की, दूधसागर धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला रेल्वे लाईनवरून सरळ चालत जावं लागतं. या रेल्वे लाईनवरून चालत असताना तुम्हाला अनेक बोगद्यांमधून जावं लागेल. या मार्गावरचा सर्वात लांब बोगदा हा २.५ किलोमीटर एवढा लांब आहे. दूधसागर धबधबा हा कॅसल रॉक रेल्वे स्थानकापासून ११ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. (dudhsagar falls trek)
(हेही वाचा – couple photoshoot : जोडीदारासोबत वेडिंग पोज कशी द्यायची माहित नाही? मग हा लेख वाचा आणि रोमान्सच्या दुनियेत हरवून जा)
ही रेल्वे लाईन भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यामधून जाणारी आहे. इथल्या जंगलातून चालताना तुम्हाला इथल्या समृद्ध वनस्पती आणि प्राण्यांची सुंदर झलक दिसते. घनदाट जंगल आणि हंगामी धबधब्यांमधून जाणारा हा मार्ग तुमचा ट्रेक अत्यंत मजेशीर आणि रोमांचक बनवतो. या शांत जंगलातुन पुढे जाताना, तुम्हाला दूरवरूनच धबधब्याचा आवाज ऐकू येतो.
दूधसागर धबधब्यावर पोहोचल्यानंतर ३१० मीटर एवढ्या उंचीवरून खाली वाहणारं पाणी पाहताना तुमचं भान नक्कीच हरपून जाईल. धबधब्याचं वाहणारं पाणी, आजूबाजूचे खडक आणि हिरवीगार वन संपत्ती हे सगळं एकत्रितपणे निसर्गाच्या समृध्दीचं परिपूर्ण चित्र उभं करतात. दूधसागर धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जवळजवळ ७ तास एवढा कालावधी लागतो. तुम्ही दूधसागर स्टेशनवर कॅम्पिंग करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे तुमचं स्वतःचं कॅम्पिंग टूल असायला हवं. (dudhsagar falls trek)
(हेही वाचा – शांतता राखण्याच्या प्रयत्नात दोन्ही राष्ट्रप्रमुखांची बाचाबाची | Donald Trump | Volodymyr Zelenskyy)
दूधसागर धबधब्याचा ट्रेक करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
दूधसागर धबधब्यावर ट्रेक करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे पावसाळ्यानंतरचे महिने होय. पावसाळ्यानंतर धबधब्यातून कमी प्रमाणात पाणी वाहत असतं आणि ते ट्रेकर्ससाठी सुरक्षितही असतं. पण पावसाळ्यात मात्र या धबधब्यांचा जोर खूप जास्त असतो. पावसाळ्याच्या काळात इथे ट्रेक करणं असुरक्षित असू शकतं.
उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये दूधसागर धबधब्यांमध्ये खूप कमी पाणी असतं. त्यामुळे या दिवसांत जर तुम्ही ट्रेकचा विचार करत असाल तर, तुम्हाला धबधब्याचा पूर्ण अनुभव आणि आनंद घेता येणार नाही. (dudhsagar falls trek)
दूधसागर धबधब्याच्या तळाशी कसं पोहोचायचं?
बंगळुरूहून वास्को किंवा मडगावला जाणाऱ्या ट्रेनने तुम्हाला कॅसल रॉक या रेल्वे स्थानकावर पोहोचावं लागेल. त्यामुळे कॅसल रॉक स्थानकावर थांबणारीच ट्रेन पकडा. त्यानंतर पुढे तुम्हाला पायी चालत ट्रेक करावा लागेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community