युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या सार्वजनिक वादानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या युरोपीय देशांना चांगलेच सुनावले आहे. सोशल मीडियावर ट्रम्प यांनी पोस्ट करून युरोपियन देशांना रशियाचे राष्ट्रप्रमुख ब्लादिमीर पुतिन यांची चिंता करू नका, तुमच्या देशामध्ये काय सुरु आहे, याकडे लक्ष द्या, असा सल्ला दिला आहे.
(हेही वाचा हातात कॅमेरा, समोर सिंह… PM Narendra Modi यांनी गुजरातच्या गीर जंगलात सिंह सफारीचा घेतला आनंद, येथे पहा फोटो)
झेलेन्स्की यांना ट्रम्प (Donald Trump) यांनी सुनावल्यानंतर युरोपियन देश ट्रम्प यांच्या विरोधात गेले आहेत. अशा वेळी ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आपण पुतिनबद्दल काळजी करण्यात कमी वेळ घालवला पाहिजे आणि आपल्या देशात येणाऱ्या स्थलांतरित बलात्कार टोळ्या, ड्रग माफिया, खुनी आणि मानसिक संस्थांमधील लोकांबद्दल काळजी करण्यात जास्त वेळ घालवला पाहिजे, असे म्हटले आहे. शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत झेलेन्स्की आणि ट्रम्प (Donald Trump) आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यात जोरदार वादविवाद झाला. नेत्यांमधील वादानंतर वॉशिंग्टन आणि कीव यांच्यातील आर्थिक करारावर स्वाक्षरी होऊ शकली नाही. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ म्हणाले की, व्हाईट हाऊसमधील झेलेन्स्कीचे वर्तन लज्जास्पद होते.
Join Our WhatsApp Community