विधान परिषदेतील पाच जागा रिक्त; कार्यकर्त्यांची fielding!

51

राज्य विधिमंडळ विधान परिषदेतील (state legislative council) पाच सदस्य विधानसभेत निवडून गेल्याने, परिषदेतील पाच रिक्त झालेल्या जागांसाठी २७ मार्चला निवडणूक होणार आहे. त्यासाठी आता भाजपा (BJP), शिवसेना (शिंदे) (Shiv Sena (Shinde)) आणि अजित पवार (Ajit Pawar NCP MLC) यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कार्यकर्त्यांनी फिल्डिंग (party workers) लावायला सुरुवात केली. (fielding)

मोठी कसरत
रिक्त झालेल्या पाच जागांमध्ये ३ भाजपा आणि प्रत्येकी एक शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अप) (Ajit Pawar NCP MLC) यांच्या आहेत. शिवसेनेचे आमश्या पाडवी, राष्ट्रवादीचे (अप) आमदार राजेश विटेकर तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके हे विधानसभा निवडणुकीत (assembly elections) निवडून गेल्याने त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त (vacant seats) झाली आहे. या पाचही जागांसाठी विधानसभेतील आमदार मतदान करून निवडून देणार असल्याने महायुतीचे विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील, यात शंका नाही. त्यामुळे निवडणूक कदाचित बिनविरोधही होऊ शकते. असे असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवार निवडीवरून मोठी कसरत करावी लागणार, असे दिसते.

(हेही वाचा – Congress चे Nana Patole करणार अजित पवारांचे अभिनंदन!)

विधानसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांनीही विधान परिषदेसाठी फिल्डिंग (fielding) लावली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर पक्षातील बड्या नेत्यांभोवती फिरणाऱ्या काही ‘उपनेत्यांनी’ही विधान परिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. परिषदेवर वर्णी लागल्यास सहा वर्षासाठी आमदारकी तसेच भविष्यात निवृत्ती वेतन (पेन्शन) सुरू होत असल्याने या जागांवर अनेक संधीसाधू नेत्यांची नजर असते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.