Champions Trophy, Ind vs Aus : भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान कसं असेल दुबईतील हवामान, मैदानावरील खेळपट्टी?

115
Champions Trophy, Ind vs Aus : भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान कसं असेल दुबईतील हवामान, मैदानावरील खेळपट्टी?
Champions Trophy, Ind vs Aus : भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान कसं असेल दुबईतील हवामान, मैदानावरील खेळपट्टी?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने रविवारी २ मार्च रोजी न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव करून चॅम्पियन्स करंडकातील (Champions Trophy) आपली विजयी मालिका कायम राखली आहे. उपान्त्य फेरीत संघ आधीच पोहोचला होता. शेवटच्या विजयानंतर भारतीय संघाचा बाद फेरीतील प्रतिस्पर्धी संघ ठरला आहे. मंगळवारी स्पर्धेच्या पहिल्या उपान्त्य सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमने सामने येणार आहेत. आयसीसीच्या (ICC) मोठ्या स्पर्धांमधील हे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणावे लागतील इतक्या वेळा दोघांनी बाद फेरीतले सामने खेळले आहेत. त्यातच मंगळवारच्या सामन्याला किनार असेल ती २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीत भारताच्या झालेल्या पराभवाची. तेव्हाही भारतीय संघाने तोपर्यंतचे सर्व सामने जिंकले होते. आणि अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने मात्र भारताचा ६ गडी राखून पराभव केला होता.

आता या पराभवाची परतफेड करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. त्या जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर एकदिवसीय प्रकारात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येत आहेत. यावेळी मैदान आहे दुबईतील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअम (International Cricket Stadium). या महत्त्वाच्या सामन्यासाठी दुबईचं हवामान, खेळपट्टीचं स्वरुप कसं असेल ते पाहूया,

(हेही वाचा – Veer Savarkar : वीर सावरकर विचारांची ‘एक तरी पणती लावुया…’)

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

मंगळवारी दुबईत पावसाची कुठलीही शक्यता नाही. तर स्वच्छ सूर्यप्रकाशाबरोबरच दुबईतील आकाश निरभ्र असेल असा हवामानाचा अंदाज ॲक्युवेदर वेबसाईटवर देण्यात आला आहे. खेळाच्या पहिल्या सत्रात सर्वाधिक तापमान ३० अंश सेल्सिअल इतकं चढेल. तर दुसऱ्या सत्रात ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल, असाही अंदाज आहे.

दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर (International Cricket Stadium) आतापर्यंत फिरकीची जादू चालली आहे. आणि आताही उपान्त्य फेरीच्या सामन्यात फिरकीपटूंची कामगिरी निर्णायक ठरेल असा अंदाज आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यांत तर भारतीय संघाने ४ फिरकीपटूंना संघातून खेळवलं. आणि ही चालही यशस्वी झाली. फिरकीला चांगलं खेळून काढणारा संध सामन्यावर वर्चस्व गाजवू शकतो.

(हेही वाचा – BMC : उष्णतेचे प्रमाण वाढले, महापालिकेने झाडे वाचवण्यासाठी हाती घेतली ‘ही’ मोहिम)

पहिल्या उपान्त्य सामन्यात पंच कोण असणार आहेत ते बघूया,

या सामन्यासाठी न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ (Richard Illingworth) हे मैदानावरील पंच असतील. तर इंग्लंडचे मायकेल गॉ हे तिसऱ्या पंचाची भूमिका पार पाडतील. झिंबाब्वेचे अँड्र्यू पायक्रॉफ हे आयसीसीचे सामनाधिकारी असतील.

भारत आणि ऑस्ट्रेलिया ()दरम्यान आतापर्यंत एकूण १५१ एकदिवसीय सामने झाले आहेत. आणि यातील ८४ सामने ऑस्ट्रेलियाने तर ५७ सामने भारताने जिंकले आहेत. १० सामने अनिर्णित राहिले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.