Champions Trophy, Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्ध चक्रवर्तीला खेळवायचं की हर्षित राणाला, भारतासमोरचा प्रश्न

चॅम्पियन्स करंडकात भारत वि ऑस्ट्रेलिया असा उपान्त्य सामना रंगणार आहे.

89
Champions Trophy, Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्ध चक्रवर्तीला खेळवायचं की हर्षित राणाला, भारतासमोरचा प्रश्न
Champions Trophy, Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्ध चक्रवर्तीला खेळवायचं की हर्षित राणाला, भारतासमोरचा प्रश्न
  • ऋजुता लुकतुके

गेल्या रविवारी न्यूझीलंड संघाचा ४४ धावांनी पराभव करत भारतीय संघाने अ गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यामुळे उपान्त्य फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियन (Ind vs Aus) संघाशी पडणार आहे. २०२३ च्या एकदविसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अहमदाबादमध्ये हे दोन संघ शेवटचे आमने सामने आले होते. त्यानंतर दोघांमध्ये एकदिवसीय सामना झालेला नाही. त्या सामन्यात भारताला जिव्हारी लागलेला पत्करावा लागला होता. या पराभवाचं उट्ट काढण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. (Champions Trophy, Ind vs Aus)

यावेळी ऑस्ट्रेलियन संघ काहीसा दुबळा आहे. खुद्द कर्णधार पॅट कमिन्स खेळत नाहीए. तर महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत झाली आहे. अशावेळी मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि ट्रॅव्हिस हेडवर (Travis Head) संघाची मदार असणार आहे. तर भारतीय संघाने आतापर्यंतचे ३ सामने वर्चस्व राखून जिंकले आहेत. आता उपान्त्य फेरीत संघासमोर एकच समस्या आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ ४ फिरकीपटू घेऊन खेळला. वरुण चक्रवर्तीने (Varun Chakaravarthy) ५ बळी मिळवत दमदार कामगिरीही केली. आता त्याला संघात कायम ठेवायचं तर संघात ४ फिरकीपटू होतील. तीच रणनीती कायम ठेवायची की, हर्षितला संधी द्यायची असा प्रश्न संघ प्रशासनासमोर असेल. (Champions Trophy, Ind vs Aus)

(हेही वाचा – Aurangzeb चे सोशल मीडिया पोस्टद्वारे लांगूलचालन करणाऱ्या धर्मांध सेल्समनला अटक)

माजी कसोटीपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी आयसीसीच्याच एका कार्यक्रमात बोलताना याचं उत्तर दिलं आहे. ‘सामन्यासाठी तयार केलेल्या खेळपट्टीवर रविवारी खेळाडू क्षेत्ररक्षण करताना धावले आहेत. ती खेळपट्टीही त्यामुळे दमली आहे. अशावेळी संघात फिरकीपटू जास्त झाले तरी चालेल. सामन्यावर त्यांचंच निर्विवाद वर्चस्व राहणार आहे,’ असं रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले.

न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाने रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती (Varun Chakaravarthy) असे चार फिरकीपटू खेळवले. या चौघांनी मिळून ३७.४ षटकं टाकली. यात ९ फलंदाजांना बाद केलं. खेळपट्टी जशी जुनी होईल तशी ती फिरकीला जास्तीत जास्त साथ देईल, असा शास्त्री यांचा अंदाज आहे.

‘पहिली फलंदाज केलीत तर, अगदी २४०-५० ची धावसंख्याही या खेळपट्टीवर पुरेशी वाटतेय. उपान्त्य फेरीसारख्या दडपण वाढवणाऱ्या सामन्यात ही धावसंख्या पुरेशी ठरेल,’ असं शास्त्री यांनी बोलून दाखवलं. तर वरुण चक्रवर्ती (Varun Chakaravarthy) पुन्हा एकदा भारताला सामना जिंकून देऊ शकतो, असं शास्त्री यांचं मत आहे. वरुण चक्रवर्तीने (Varun Chakaravarthy) न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला आयसीसी सामना खेळताना ४२ धावांत ५ बळी मिळवले होते. तोच सामनावीर ठरला होता. (Champions Trophy, Ind vs Aus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.