Ajinkya Rahane : आयपीएलच्या नवीन हंगामासाठी अजिंक्य रहाणे कोलकात्याचा कर्णधार

फ्रँचाईजीने वेंकटेश अय्यरची उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

39
Ajinkya Rahane : आयपीएलच्या नवीन हंगामासाठी अजिंक्य रहाणे कोलकात्याचा कर्णधार
Ajinkya Rahane : आयपीएलच्या नवीन हंगामासाठी अजिंक्य रहाणे कोलकात्याचा कर्णधार
  • ऋजुता लुकतुके

गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) फ्रँचाईजीने नवीन हंगामासाठी संघाचं नेतृत्व अनुभवी अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) सोपवलं आहे. तर वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) संघाचा उपकप्तान असणार आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या खेळाडूंच्या मेगा लिलावात कोलकाता फ्रँचाईजीने अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) त्याची मूळ किंमत १.५ कोटी रुपयांत विकत घेतलं होतं. तर वेंकटेश अय्यरसाठी (Venkatesh Iyer) कोलकाता संघाने २३.७५ कोटी रुपये मोजले आहेत. गेल्या हंगामात श्रेयस अय्यरने संघाचं यशस्वीपणे नेतृत्व केलं होतं. पण, त्याला फ्रँचाईजीने यंदा कायम ठेवलं नाही.

‘अजिंक्यची कर्णधार म्हणून नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे. तो अनुभवी आणि प्रगल्भ क्रिकेटपटू आहे. तर वेंकटेशही चांगले नेतृत्व गुण असलेला खेळाडू आहे. दोघं मिळून संघाची विजय परंपरा कायम राखतील, असा आम्हाला विश्वास आहे,’ असं संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसोर यांनी म्हटलं आहे. तर कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर रहाणेनंही समाधान व्यक्त केलं आहे.

(हेही वाचा – Paytm च्या मुख्य कंपनीस ६११ कोटींची नोटीस; नेमके प्रकरण काय?)

‘आयपीएलमधील एका यशस्वी फ्रँचाईजीचं नेतृत्व करणं हा मी माझा गौरव समजतो. आमचा संघ खूपच चांगला आणि संतुलित आहे. आता प्रत्येक खेळाडूबरोबर सुसंवाद राखून विजेतेपद आमच्याकडेच कायम राखण्याचं आव्हान मी स्वीकारलं आहे,’ असं अजिंक्यने म्हटलं आहे.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir वरील हल्ल्याचा कट उधळला; आयएसआयचा हस्तक अब्दुल रहमानला फरीदाबादमधून अटक)

कोलकाता संघानेही आपला कर्णधार आता जाहीर केला आहे. दिल्ली कॅपिटल्स या एकमेव संघाने अजूनपर्यंत आपला कर्णधार जाहीर केलेला नाही. गेल्यावर्षी दिल्ली फ्रँचाईजीचं नेतृत्व ऋषभ पंतने (Rishabh Pant) केलं होतं. पण, नंतर दिल्लीने त्याला आपल्याकडे कायम राखलं नाही. ऋषभ (Rishabh Pant) आता लखनौ सुपरजायंट्सकडून खेळणार आहे. आणि त्या फ्रंचाईजीचं नेतृत्वही करणार आहे.

यंदाचा आयपीएल हंगाम २२ मार्चला सुरू होणार आहे. यात पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) असा होणार आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) विरुद्ध विराट कोहली (Virat Kohli) असा एक मुकाबला या सामन्यात बघायला मिळेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.