बीडच्या (Beed) केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख (Santosh Deshmukh)यांच्या हत्या प्रकरणाला ८० दिवस उलटले आहेत. अद्याप या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला शिक्षा झालेली नाही. त्यातच धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यानंतर मुंडेंनी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत असल्याचे ‘एक्स’वर लिहले आहे.
हेही वाचा : Ajinkya Rahane : आयपीएलच्या नवीन हंगामासाठी अजिंक्य रहाणे कोलकात्याचा कर्णधार
दरम्यान धनंजय मुंडे यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत लिहले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असे मुंडे म्हणाले.
तसेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यावर राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दोन वाक्यात यावर प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले की, “धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे.”
हेही पाहा :