Dhananjay Mundhe Resigns: त्यांनी मंत्रीपदाची शपथच घ्यायला नको होती; पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

79

Dhananjay Mundhe Resigns : धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा मंत्रिपदावरून अखेर राजीनामा घेण्यात आला आहे. दिवंगत संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणातील पाशवी हत्येच्या अमानुष फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. छायाचित्र व्हायरल होताच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीनं जोर धरला होता. अशातच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावर मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Dhananjay Mundhe Resigns)

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री पकंजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्यायलाच नको होतं. राजीनामा आधीच द्यायला हवा होता’, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

(हेही वाचा – ICC Women Qualifiers : पाकिस्तानमध्ये होणार महिला एकदिवसीय विश्वचषकाची पात्रता फेरी)

धनंजय मुंडेंची पोस्ट
दरम्यान धनंजय मुंडे यांनीही, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनाम दिल्याची माहिती एक्सवर पोस्ट करून दिली. आपल्या पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र (charge sheet) न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे सोपवलाला आहे.”

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.