एखाद्याला ‘मियाँ-तियाँ’, पाकिस्तानी म्हणणे, गुन्हा नाही; Supreme Court चा निर्वाळा

52
एखाद्याला 'मियाँ-तियाँ', पाकिस्तानी म्हणणे, गुन्हा नाही; Supreme Court चा निर्वाळा
एखाद्याला 'मियाँ-तियाँ', पाकिस्तानी म्हणणे, गुन्हा नाही; Supreme Court चा निर्वाळा

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार ०४ मार्चला एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले असून, “एखाद्याला ‘मियाँ-तियाँ’ (Mian-Tian) किंवा ‘पाकिस्तानी’ म्हणणे चुकीचे असले तरी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम २९८ अंतर्गत धार्मिक भावना दुखावण्याच्या गुन्ह्यात मोडत नाही,” असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणातील संशयित, ८० वर्षीय हरि नारायण सिंह (Hari Narayan Singh) यांची निर्दोष मुक्तता केली. (Supreme Court)

(हेही वाचा – Women’s Day 2025 : महिला दिनाच्या निमित्ताने ठाण्यात होणार संगीत महाकुंभ सोहळा)

काय होते प्रकरण ?
न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना (Justice BV Nagaratna) आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा (Justice Satish Chandra Sharma) यांच्या खंडपीठासमोर झारखंड उच्च न्यायालयाच्या (High Court of Jharkhand) निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या अपीलावर विचार सुरू होता. तसेच झारखंडमधील बोकारो येथील चास येथील उपविभागीय कार्यालयात उर्दू भाषांतरकार आणि कार्यवाहक लिपिक (माहितीचा अधिकार) मोहम्मद शमीमुद्दीन यांनी या प्रकरणी फिर्याद दिली हाेती. त्‍यांनी आरोप केला हाेता की, माहिती अधिकार अर्जासंदर्भात माहिती देण्यासाठी ते अपीलकतेर्ते ८० वर्षीय हरि नारायण सिंह यांच्‍याकडे गेले हाेते. यावेळी हरि नारायण सिंह यांनी त्यांना ‘मियाँ-तियाँ’ आणि पाकिस्तानी असे संबाेधले. शमीमुद्दीन यांनी दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे हरि नारायण सिंह यांविरुद्ध कलम २९८ (धार्मिक भावना दुखावणे), ५०४ (जाणीवपूर्वक अपमान आणि शांतता भंग), ५०६ (गुन्हेगारी कट रचणे), ३५३ (सरकारी सेवकाशी गैरवर्तन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला हाेती. पोलिसांनी हरि नारायण सिंह यांच्‍यावर आरोपपत्र दाखल केले. जुलै २०२१ मध्ये, दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत संशयित आरोपीवर समन्स जारी केले. हरि नारायण सिंह यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि त्‍यानंतर उच्च न्यायालयात अपील दाखल केले. मात्र दिलासा न मिळाल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

(हेही वाचा – Donald Trump यांनी युक्रेनला युद्धात दिलेली सर्व लष्करी मदत थांबवली)

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

दरम्यान, ११ फेब्रुवारी दिलेल्‍या निकालात खंडपीठाने म्‍हटलं आहे की, “एखाद्याला ‘मियाँ-तियाँ’ किंवा ‘पाकिस्तानी’ म्हणणे निःसंशयपणे चुकीचे आहे; पण या प्रकरणात याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. या टिप्पण्या चुकीच्‍या हाेत्‍या; परंतु हे प्रकरण भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम २९८ अंतर्गत धार्मिक भावना दुखावण्याच्या गुन्ह्यात मोडत नाही, असे स्‍पष्‍ट करत खंडपीठाने हरि नारायण सिंह यांच्‍यावरील धार्मिक भावना (religious sentiments) दुखावल्याप्रकरणाचा खटला फेटाळला.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.