भारतात एकीकडे वक्फ ( Waqf Board ) दुरूस्ती विधेयकाबाबत कायदेशीर लढाई सुरु असताना दुसरीकडे वक्फ बोर्डाचा मनमानी कारभार सुरु असल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) रायसेन (Raisen) जिल्ह्यातील एका हिंदू (Hindu) बहुसंख्याक गावावर वक्फ बोर्डाने दावा ठोकल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही कळस म्हणजे, वक्फने गावात स्थापन केलेल्या शिवलिंगावरही दावा ठोकला आहे.
हेही वाचा : ‘आझमी, छावा बघा छावा’; Eknath Shinde अबू आझमींविरोधात आक्रमक
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्डाकडून ( Waqf Board ) रायसेनच्या (Raisen) माखनी गावातील लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. बोर्डाने नोटीसीत म्हटले की, गावकरी ज्या जमिनीवर राहत आहेत ती जमीन प्रत्यक्षात वक्फ बोर्डाची आहे. त्यामुळे त्यांनी गाव रिकामे करण्यास सांगितले आहे. तसेच हिंदूंचे (Hindu) वास्तव्य असलेली जमीन प्रत्यक्षात दफनभूमी असल्याचेही नोटीसीत म्हटले आहे. वक्फ बोर्डाने ज्या मालमत्तेवर दावा केला आहे त्यात घरे, जमीन, शेती आणि हिंदूंचे (Hindu) आस्थेचे प्रतीक असलेले शिवलिंग यांचा समावेश आहे. ही जागा मोकळी न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा बोर्डाने दिला आहे.
दरम्यान वक्फकडे यासंदर्भात कोणताही पुरावा नाही की ज्याच्या आधारे ही जमीन आपलीच असल्याचे सिद्ध होऊ शकेल. त्यातच कहर म्हणजे वक्फ बोर्डानेही गावाची तीन एकर जमीन परस्पर स्वत:ची म्हणून घोषित केली आहे. या जमिनीची महसूल विभागाच्या अभिलेखात सरकारी मालमत्ता म्हणून नोंद आहे. मात्र कादर खान (Kader Khan) नावाच्या व्यक्तीची ही सगळी जमीन असून जमीन वक्फला दान केल्याचा वक्फ बोर्डाचा (Waqf Board) दावा आहे. त्यामुळे हिंदूंनी (Hindu) या घटनेचा आक्रमकपणे विरोध केला आहे. कारण अनेक पिढ्यांपासून ते या गावात राहत असल्याचे लोक सांगत आहेत. वास्तविक गावात कादर खान नावाची व्यक्ती राहातच नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community