माजी राष्ट्रपतींची जमीन हडपली; मंत्री Jayakumar Rawal यांना न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांना देखील Jayakumar Rawal आणि त्यांच्या कुटुंबियांनी सोडलेले नाही, तर इतर गरीब कुटुंबियांचे काय? असा प्रश्न अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.

86

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Former President Pratibha Patil) यांची दोंडाईचा शिवारातील तब्बल २६ एकर जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी ही जमीन हडप केली आहे, असा आरोप माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी केला आहे. या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने (District Court Dhule) रावल कुटुंबाने राष्ट्रपतींची हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत.

(हेही वाचा – छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात Shiv Sena चे राज्यभर आंदोलन)

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांना देखील जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी सोडलेले नाही, तर इतर गरीब कुटुंबियांचे काय? असा प्रश्न देखील अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.

मंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) हे सलग पाचव्यांदा भाजपाकडून (BJP) आमदार राहिले आहेत. दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक पदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. २८ व्या वर्षी तत्कालीन मंत्री हेमंत देशमुख यांचा पराभव करून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यांनी इंग्लंडमधील कार्डिफ विद्यापिठात बिजनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. २०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबीनेटमंत्रीपदी जयकुमार रावल यांची निवड झाली. पर्यटन, अन्न औषध, राजशिष्टाचार या खात्याचा कारभार त्यांनी सांभळला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.