टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. ऑलिम्पिकच्या शेवटच्या क्षणी नीरजने भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. तसेच भारताने या पदकाने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकले आहेत. त्यानंतर मात्र चोप्राने ८७.५८ मीटर पर्यंत भाला फेकून प्रथम क्रमांक मिळवले.
THE THROW THAT WON #IND A #GOLD MEDAL 😍#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion @Neeraj_chopra1 pic.twitter.com/F6xr6yFe8J
— Olympic Khel (@OlympicKhel) August 7, 2021
नीरज चोप्राचा भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राची धडाकेबाज सुरुवात केली. नीराज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या फेरीत ८७.५८ मी इतका लांब भालाफेक करुन आपले पहिले स्थान कायम ठेवले. तिसऱ्या फेरीत मात्र नीरज चोप्राने ७६.७९ मी इतका भालाफेक केली. तिसऱ्या फेरीत नीरज थोडा मागे पडला.
अंतिम फेरीत होते १२ स्पर्धक!
नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते. नीरजने पहिल्या प्रयत्नात ८७.०३, दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८, तिसऱ्या प्रयत्नात ७६.९७, चौथा प्रयत्न फाऊल झाला.
कोण आहे नीरज चोप्रा?
नीरज चोप्रा हा सैन्य दलातील अधिकारी आहे. त्याने ८८.०७ मीटर पर्यंत भाला फेकून स्वतःचाच राष्ट्रीय स्तरावरील रेकॉर्ड मोडला आहे. २४ डिसेंबर १९९७ रोजी पानिपत येथे जन्म झालेला नीरज हा सैन्य दलात सुभेदार पदावर कार्यरत आहे. त्याचा प्रशिक्षक यु होन हे आहेत. नीरजने २९१८च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते.
Join Our WhatsApp Community