माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी कोणाचाही अपमान केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज या सर्व महान पुरुषांचा मी आदर करतो. सर्वांनी त्यांचा आदर करायला हवा, यांना आदर्श मानून वाटचाल करायला हवी. मी औरंगजेबाबद्दल (Aurangzeb) जे वक्तव्य केलं ते इतिहासकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर केलं होतं. परंतु, त्या वक्तव्यामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब व्हायला नको होतं. विधीमंडळात आपल्याला खूप कामं करायची आहेत. जनतेची कामं प्रलंबित आहेत. विधीमंडळाचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी मी माझं वक्तव्य मागे घेतो, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी (Abu Azmi) यांनी माघार घेतली आहे.
(हेही वाचा – वनतारा वाईल्डलाईफचे PM Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन; सिंहाच्या छाव्यांना दूध पाजलं, वाघासोबत काढले फोटो)
समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. विधानसभेतही त्याचे मोठे पडसाद उमटले. ४ मार्च या दिवशी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (budget session 2025) दुसरा दिवस होता. यामध्येही सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून सभागृहात निषेध व्यक्त केला. त्यामुळे विधीमंडळाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
विधीमंडळाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अबू आझमी यांनी ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, तर त्याच्या काळात जीडीपी सर्वाधिक होता’, असे औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. यानंतर आबू आझमी यांनी मवाळ भूमिका घेतली आहे.
मेरे शब्दों को तोड़-मरोड़ कर दिखाया गया है। औरंगज़ेब रहमतुल्लाह अलेह के बारे में मैंने वही कहा है जो इतिहासकरों और लेखकों ने कहा है। मैंने छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज या अन्य किसी भी महापुरषों के बारे में कोई अपमानजनक टिपण्णी नहीं की है – लेकिन फिर भी मेरी इस बात से कोई… pic.twitter.com/k7PY0ICe3b
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) March 4, 2025
आझमी (Abu Azmi) यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे, “माझ्या वक्तव्याची मोड-तोड करून ते सादर करण्यात आले आहे. औरंगजेब रहमतुल्लाह अलेह यांच्याबद्दल मी तेच वक्तव्य केलं, जे इतिहासकारांनी व लेखकांनी आपल्यासमोर मांडले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अन्य कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणत्याही प्रकारचे अपमानजनक वक्तव्य केले नाही. तरीदेखील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माझे शब्द आणि संपूर्ण वक्तव्य मागे घेतो. माझे वक्तव्य एक राजकीय मुद्दा बनले आहे. माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन तहकूब होणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे जनतेचे नुकसान होत आहे.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community