वाल्मिक कराडला फाशी द्या; Shiv Sena चे मुंबईत जोरदार आंदोलन

66
वाल्मिक कराडला फाशी द्या; Shiv Sena चे मुंबईत जोरदार आंदोलन
  • प्रतिनिधी

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला फाशी द्या, या मागणीसाठी शिवसेनेने (Shiv Sena) मंगळवारी मुंबईतील बाळासाहेब भवनसमोर जोरदार आंदोलन केले. सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी कराडच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारले. शिवसेना नेत्या मीना कांबळी, शीतल म्हात्रे, तृष्णा विश्वासराव, संध्या वढावकर, कला शिंदे, उपनेते अनंदराव जाधव, अनिल पडवळ, युवासेना कार्यकारणी सदस्य निखिल जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. (Shiv Sena)

(हेही वाचा – Local Body Election पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने वेळ मागितला)

देशमुख यांच्या अमानुष मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मुंबईत त्याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले. शिवसेनेच्या (Shiv Sena) महिला आघाडीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन समोर कराड (Walmik Karad) विरोधात आंदोलन केले. पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. (Shiv Sena)

(हेही वाचा – MVA आघाडीत धुसफूस सुरूच!)

दरम्यान, कराड (Walmik Karad) ही प्रवृत्ती असून देशमुख यांचे व्हायरल झालेल्या फोटोंमधून या हत्याकांडाची भीषणता दिसून येते. महाराष्ट्रात अशा गोष्टी होतात हे दुदैवी आणि लाजीरवाणे आहे. कराडला केवळ शिक्षा होऊन चालणार नाही. तर कराडसह हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी महिला नेत्यांनी केली. तसेच कराडला फाशी व्हावी, याकरिता शिवसेना (Shiv Sena) राज्यभरात रान उठवणार असल्याचे सांगितले. (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.