पक्ष बळकटीसाठी Shiv Sena च्या संपर्क प्रमुखांची नियुक्ती

59
पक्ष बळकटीसाठी Shiv Sena च्या संपर्क प्रमुखांची नियुक्ती
  • प्रतिनिधी

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी ११ मंत्र्यांना विविध जिल्ह्यांच्या संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. या निर्णयामुळे पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी प्रयत्न सुरू आहेत. (Shiv Sena)

(हेही वाचा – पाकिस्तानी सैन्य आणि चीनच्या लुटीला Balochistan करणार कडवा विरोध; केली युद्धाची घोषणा)

मंत्र्यांची नियुक्ती आणि त्यांचे जिल्हे :

गुलाबराव पाटील : परभणी, बुलढाणा
उदय सामंत : मुंबई उपनगर, पुणे, सिंधुदुर्ग
शंभूराजे देसाई : सांगली, नगर
संजय राठोड : नागपूर, चंद्रपूर, अमरावती
दादा भुसे : धुळे, नंदुरबार
प्रताप सरनाईक : पालघर, सोलापूर
भरत गोगावले : हिंगोली, वाशिम
संजय शिरसाट : बीड, नांदेड
प्रकाश आबिटकर : अकोला, लातूर
आशिष जैयस्वाल : भंडारा, गोंदिया
योगेश कदम : जालना

(हेही वाचा – मुंबईत Zomato सेवेत महापालिका उतरवणार बचत गटांच्या महिलांना; प्रायोगिक तत्वावर ‘टी’ विभागापासून सुरुवात)

विशेष म्हणजे, या नियुक्त्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, उदय सामंत यांची तेथे संपर्क मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Shiv Sena)

भाजपाने फेब्रुवारी महिन्यात १७ जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली होती, ज्यामध्ये शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यांचा समावेश होता. शिवसेनेने आता त्याच धर्तीवर आपल्या मंत्र्यांची नियुक्ती करून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल आणि पक्षबांधणीला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.