-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महानगरपालिकेच्या वतीने अभियांत्रिकी संवर्गातील एकूण ६९० रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षांचा कालावधी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यातील, दुय्यम अभियंता (स्थापत्य) या संवर्गाची येत्या ९ मार्च २०२५ रोजी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. (BMC)
(हेही वाचा – वाल्मिक कराडला फाशी द्या; Shiv Sena चे मुंबईत जोरदार आंदोलन)
ही परीक्षा अंदाजे १५ दिवसाच्या आत घेण्याचे नियोजित आहे. त्याअनुषंगाने या परीक्षेचा सुधारित दिनांक निश्चित झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व संबंधित उमेदवारांनी याची कृपया नोंद घ्यावी, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community