- ऋजुता लुकतुके
उपान्त्य सामन्यापूर्वी (Champions Trophy) कर्णधार रोहीत शर्माने दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमच्या खेळपट्टीवर एक मार्मिक टिप्पणी केली होती. ‘इथली प्रत्येक खेळपट्टी वेगळी आहे. आणि प्रत्येक सामन्यात ती वेगळंच वागली आहे,’ असं रोहीत म्हणाला होता. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातही ते खरं ठरलं. पण, नशीबाने फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला त्याचा फटका बसला नाही. उलट या मैदानावरील आतापर्यंतची सगळ्यात मोठी धावसंख्या २६४ त्यांनी ५ गडी आणि ११ चेंडू राखून पार केली. आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. विराट कोहलीने त्याला पाठलागाचा बादशाह का म्हणतात हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. आणि ९८ चेंडूंत ८४ धावा केल्या. २ बाद ४३ अशी धावसंख्या असताना विराटने आधी श्रेयस आणि मग अक्षर पटेलच्या साथीने भारताचा डाव सावरला. आणि संघाला विजयपथावर नेलं. त्याच्या या भक्कम फलंदाजीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. श्रेयस अय्यरने ४५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. आणि विराटबरोबर ९१ धावांची भागिदारी केली. भारतीय संघासाठी ही विजयाची पायाभरणी होती. तर अक्षरबरोबर त्याने ४४ धावांची छोटेखानी भागिदारी केली. अक्षरनेही महत्त्वपूर्ण २७ धावा केल्या. त्यानंतर के एल राहुल (नाबाद ४२) आणि हार्दिक पांड्या (२७) यांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
(हेही वाचा Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया ऑल आऊट; भारतासमोर २६५ धावांचे लक्ष्य)
८४ धावा करेपर्यंत विराट अत्यंत संयमाने खेळत होता. कोलोनीच्या गोलंदाजीवर एकदाच त्याचा झेल ग्लेन मॅक्सवेलने सोडला. बाकी त्याने एकेरी धावांवरच भर दिला होता. पण, अचानक ॲडम झंपाच्या गोलंदाजीवर त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचं शतक हुकलं. पण, तोपर्यंत भारतीय संघ सुरक्षित होता. विराटने धावांचा पाठलाग करताना एकूण ८२०० च्या वर धावा केल्या आहेत. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे विराटच्या एकूण १४,००० च्या वर एकदिवसीय धावांमध्ये ५,४०० धावा त्याने फक्त एकेरी धावून काढल्या आहेत. भारतीय संघ आता चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचला असून ९ मार्चला दुबईतच न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्याबरोबर त्यांचा अंतिम सामना होईल. (Champions Trophy)
𝙄𝙉𝙏𝙊 𝙏𝙃𝙀 𝙁𝙄𝙉𝘼𝙇𝙎 🥳
Scorecard ▶️ https://t.co/HYAJl7biEo#TeamIndia | #INDvAUS | #ChampionsTrophy pic.twitter.com/k67s4fLKf3
— BCCI (@BCCI) March 4, 2025
आधीच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील अनुभवामुळे दोन्ही संघांनी आज फिरकीपटूंना संघात स्थान दिलं होतं. भारतीय संघही ४ फिरकीपटू घेऊन मैदानात उतरला. पण, त्या मानाने खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारीच निघाली. आणि अचानक खाली राहणारा चेंडू अधून मधून फलंदाजांना सतावत असला तरी बाकी फलंदाजांसाठी धावा कठीण नव्हत्या. त्यातच ट्रेव्हिस हेडने वेगवान सुरुवात ऑस्ट्रेलियन संघाला करून दिली. पण, वरुण चक्रवर्तीने त्याला ३९ धावांवर बाद केलं. त्यानंतर स्टिव्ह स्मिथने ७३ धावा करत ऑस्ट्रेलियन संघाला आकार दिला. तर सहाव्या क्रमांकावरील ॲलेक्स कॅरीने ५७ चेंडूंत ६१ धावा करत संघाला अडीचशेच्या पार नेलं. (Champions Trophy) ३ गडी बाद केले. तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी २ गडी गारद केले. या विजयासह भारतीय संघाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम फेरीतल्या पराभवाचा बदला घेतला आहे.
Join Our WhatsApp Community