Champions Trophy, Ind vs Aus : विराट कोहलीला पाठलागांचा बादशाह का म्हणतात, आकडेवारीतून आलं समोर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने ९८ चेंडूंत ८४ धावा केल्या.

58
Virat Kohli एकदिवसीय क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर, गिल - बाबर पहिल्या क्रमांकावर कायम
Virat Kohli एकदिवसीय क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर, गिल - बाबर पहिल्या क्रमांकावर कायम
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून दिमाखात पराभव करत चॅम्पियन्स (Champions Trophy) करंडकाची अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम सामना ९ मार्चला दुबईतच होणार आहे. उपान्त्य सामन्यात भारतासमोर जिंकण्यासाठी २६५ धावांचं आव्हान होतं. आणि रोहित, शुभमन बाद झाल्यावर संघाची अवस्था २ बाद ४३ अशी बिकट झाली होती. पण, पाठलागांचा बादशाह समजल्या जाणाऱ्या विराटने ९८ चेंडूंत ८४ धावा करत भारतीय संघाची नौका विजयसीमेपार नेली. आधी त्याने श्रेयस अय्यरबरोबर (Shreyas Iyer) ९४ धावांची भागिदारी केली. त्यानंतर अक्षर पटेलसोबत (Axar Patel) आणखी ४४ धावा जोडल्या. (Champions Trophy, Ind vs Aus)

खुद्द विराटने (Virat Kohli) या ८४ धावांमध्ये फक्त ५ चौकार लगावले. पूर्ण खेळीदरम्यान फक्त दोनदा विराटने चेंडू हवेत खेळला. बाकी अगदी सुरक्षितपणे एकेरी धावा घेण्याचंच धोरण त्याने ठेवलं होतं. हेच त्याच्या अख्ख्या कारकीर्दीचं वैशिष्ट्य राहिलं आहे. आणि त्यामुळेच विराटला धावांचा पाठलाग करणारा बादशाह (King) म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावा करताना विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील दोन महत्त्वाचे विक्रम नावावर केले आहेत. (Champions Trophy, Ind vs Aus)

(हेही वाचा – रेल्वे प्रवाशांची पायपीट होणार कमी; राज्य शासनाने चार नवीन Police Stations ना दिली मान्यता)

त्याच्या १४,१०० एकदिवसीय धावांपैकी तब्बल ८,००० धावा त्याने पाठलाग करताना म्हणजे संघाची दुसरी फलंदाजी असताना केलेल्या आहेत. फक्त १५९ डावांमध्ये विराटने या धावा जमवल्या आहेत. या बाबतीत विराट (Virat Kohli) आता फक्त सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) मागे आहे. २३२ डावांमध्ये सचिनने ८,७२० धावा दुसरी फलंदाजी करताना केल्या आहेत. विराटची सरासरीही ६४ धावांची तगडी आहे. शिवाय त्याच्या एकूण ५१ एकदिवसीय शतकांपैकी तब्बल २८ शतकं ही तीसरी फलंदाजी करताना केलेली आहेत. (Champions Trophy, Ind vs Aus)

(हेही वाचा – Champions Trophy : ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव करत भारतीय संघ दिमाखात अंतिम फेरीत)

एकेरी धावा घेण्याच्या बाबतीतही विराटने (Virat Kohli) नवीन विक्रम केला आहे. आपल्या क्रिकेट कारकीर्दीत ५,००० पेक्षा जास्त धावा विराटने एकेरी धावांमध्ये केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा एक विक्रम आहे. विराटने १४,००० एकदिवसीय धावांपैकी ५,८६० धावा या एकेरी धावा पळून काढल्या आहेत. विराटला (Virat Kohli) क्रिकेटमधील सर्वात तंदुरुस्त खेळाडू मानलं जातं ते उगीच नाही, हेच सिद्ध करणारी ही आकडेवारी आहे. कारण, विराटच्या या विक्रमाच्या बाबतीत इतरांच्या खूप पुढे आहे. भारतीय खेळाडूंमध्ये त्याच्या खालोखाल एकेरी धावा करणारा दुसरा खेळाडू आहे महेंद्रसिंग धोनी. त्याच्या नावावर ४,७७४ धावा आहेत. (Champions Trophy, Ind vs Aus)

याशिवाय विराट कोहलीने (Virat Kohli) चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा शिखर धवनचा विक्रमही मागे टाकला आहे. शिखरने या स्पर्धेत ७०१ धावा केल्या होत्या. आता विराटच्या ७४६ धावा झाल्या आहेत. आणि स्पर्धेचा अजून एक सामना त्याच्यासाठी मागे आहे. या बाबतीत जागतिक स्तरावर तो फक्त विंडिजच्या ख्रिस गेलच्या मागे आहे. गेलने १७ सामन्यांत ७९१ धावा केल्या आहेत. (Champions Trophy, Ind vs Aus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.