शिमग्यापूर्वी Konkan Railway गडबडली; ‘या’कारणांमुळे रेल्वेची सेवा अंशतः रद्द

76

Konkan Railway : कोकणवासीयांची होळीसाठी (Holi) गावी जाण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने अतिरिक्त गाड्या देखील सोडल्या आहेत. मात्र, शिमग्याच्या तोंडावर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता सीएसएमटीला (CSMT) जाणाऱ्या गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच ‘या’ संबंधी काही ट्रेन अंशत: २१ मार्चपर्यंत रद्द करण्यात आले आहे. (Konkan Railway)

(हेही वाचा – Maharashtra Politics : गेल्या १० वर्षांत ‘या’ नेत्यांनाही सोडावे लागले होते मंत्रिपद !)

मिळलेल्या माहीतीनुसार, मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे सध्या काही रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल करण्यात आले आहे. तर गेल्या काही कालावधीपासून सीएसएमटीवरील फलाट क्रमांक १०, ११, १२, १३ विस्तारीकरणाचे काम सुरू होते. त्यापैकी सध्या १०, ११ फलाटांचे विस्तारीकरण झाले असून १२, १३ फलाटांचे काम हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण पायाभूत कामे नोव्हेंबर २०२४ पूर्ण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेने ठेवले होते. परंतु, हे काम इच्छित वेळेत पूर्ण न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या कामाची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी नुकताच पाहणी केली.   

महत्त्वाच्या गाड्यांची धाव दादरपर्यंतच
मागील अनेक महिन्यांपासून तेजस, जनशताब्दी यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांची धाव सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत होत आहे. मंगळुरू एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावते. आता २१ मार्चपर्यंत असे वेळापत्रक कायम राहणार आहे. परिणामी, प्रवाशांना ठाण्यावरून सीएसएमटी गाठण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतोय. प्रवाशांना त्यांचे सामान घेऊन, पुन्हा लोकलने किंवा टॅक्सीने प्रवास करावा लागतोय.

(हेही वाचा – रेल्वे प्रवाशांची पायपीट होणार कमी; राज्य शासनाने चार नवीन Police Stations ना दिली मान्यता)

या दिवशी अनारक्षित दादर – रत्नागिरी रेल्वे चालणार
सध्या चाकरमान्याची शिमग्यासाठी कोकणात जाण्याची लगबग सुरू आहे. रेल्वेच्या सर्व गाड्या फूल झाल्या असून अतिरिक्त सोडण्यात आलेल्या गाड्याचे आरक्षण ही फुल झाल्या आहेत. दरम्यान, कोकणात जाणाऱ्या चाकारमान्यांचे हाल होऊ नये यासाठी ११,  १३ आणि १६ मार्चला अनारक्षित दादर – रत्नागिरीपर्यंत (Unreserved Dadar – Ratnagiri passenger train) विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.