Nothing Phone 3a : नथिंग फोनची नवीन स्मार्टफोन मालिका ग्राहकांसाठी खुली; फोनसाठी मोजावे लागतील इतके पैसे

Nothing Phone 3a : या फोनमध्ये ५० मेगा पिक्सेलचा पेरीस्कोप कॅमेराही आहे.

32
Nothing Phone 3a : नथिंग फोनची नवीन स्मार्टफोन मालिका ग्राहकांसाठी खुली; फोनसाठी मोजावे लागतील इतके पैसे
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंडमधील प्रसिद्ध टेक कंपनी नथिंग फोनने अल्पावधीतच आपली बाजारपेठ तयार केली आहे. चांगल्या गुणवत्तेचे फोन तयार करण्याचा लौकिक कंपनीने मिळवला आहे. आता कंपनी आपल्या तिसऱ्या पिढीतील फोन भारतासह जगभर लाँच करत आहे. या मालिकेचं नाव आहे नथिंग फोन ३ए आणि ३ए प्रो. इतर नथिंग फोनप्रमाणेच या फोनमध्येही आधुनिक फिचर आणि चांगल्या कामगिरीसाठी आवश्यक स्नॅपड्रॅगन सातव्या पिढीतील प्रोसेसर आहे.

नथिंग 3a मालिकेतील स्मार्टफोनमध्ये १२० हर्टझ रिफ्रेश रेटसह ६.७७-इंचाचा एमोल्ड डिस्प्ले, ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि ५,००० एमएएच बॅटरी आहे. भारतात या फोनची सुरुवातीची किंमत ३९,९९९ रुपये इतकी आहे. (Nothing Phone 3a)

(हेही वाचा – Gold Rate Today Mumbai : जाणून घ्या मुंबईत आज सोन्याचा भाव काय आहे? सोन्याच्या दरात १७३ रुपयांची घसरण)

डिस्प्ले : नथिंग फोन ३ए मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७७ इंचाचा लवचिक एमोल्ड डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन १२८० बाय २४०० पिक्सेल इतकं आहे. तर पीक ब्राइटनेस १६०० निट्स आहे.

प्रोसेसर आणि ओएस : कामगिरीसाठी, फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७एस जेन ३ चिपसेट बसवण्यात आला आहे. नवीनतम ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड १५ वर चालतो.(Nothing Phone 3a)

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील पॅनलवरील ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये ८ मेगापिक्सेल सोनी अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स, ५० मेगापिक्सेल ओआयएस कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा ४x लॉसलेस झूम, ३०x अल्ट्रा झूम आणि २x नॉर्मल झूम देण्यात आला आहे. कॅमेऱ्यात पोर्ट्रेट मोड देखील उपलब्ध असेल. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी स्मार्टफोनमध्ये ५० एमपी आणि ३२ एमपी कॅमेरे उपलब्ध असतील.

बॅटरी आणि चार्जर : पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये ८० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच बॅटरी असेल.

कनेक्टिव्हिटी पर्याय : कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये ५जी, वाय-फाय, जीपीएस, एनएफसी, ब्लूटूथ आणि चार्जिंगसाठी युएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. (Nothing Phone 3a)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.