औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे Abu Azmi निलंबित; सुधीर मुनगंटीवारांनी केले जोरदार भाषण

'हाती-घोडे, तोफ, तलवारे फौंज तेरी सारी हैं, पर जंजीर मे जकडा शंभूराजा मेरा अब भी सब पे भारी हैं - सुधीर मुनगंटीवार

190

‘औरंगजेब (Aurangzeb) हा उत्तम प्रशासक होता’, असे म्हणून त्याचे उदात्तीकरण करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांचे सभागृहातून निलंबन करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव ५ मार्च रोजी सभागृहात मांडला. यावर बहुमताने अधिवेशन काळात अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहाने स्वीकारला आहे. (Budget Session 2025)

(हेही वाचा – Manipur मध्ये खंडणी आणि तस्करीमध्ये सहभागी असलेले 3 अल्पवयीन मुलांसह 5 अतिरेक्यांना अटक)

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी सभागृहात महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) आणि अबू आझमींच्या (Abu Azmi) वक्तव्यावरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. सुधीर मुनगंटीवार यांनीही या वेळी जोरदार भाषण केले. या वेळी त्यांनी छावा सिनेमातील शेर ऐकवला.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ?

चंद्रकांतदादा पाटील यांनी सादर केलेल्या अबू आझमींच्या निलंबनाच्या प्रस्तावात अजून काही बाबींचा समावेश करण्याची आवश्यकता आहे. विधान परिषदेच्या या प्रस्तावात अबू आजमींचे निलंबन हे केवळ या अधिवेशनापुरतेच का ?, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. विधान परिषदेमध्ये एका सदस्याने भर सभेत जाहीर देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल भाष्य केले. तेव्हा तुम्ही काय शिक्षा केली ? त्या वेळी आमदारांची समिती गठित करण्यात आली, तोपर्यंत त्याचे सदस्यत्व रद्द केले. सोबतच त्याचा पगार रद्द केला. रेल्वे कुपन बंद केलं. आमदार निधीही बंद केला. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण देवापेक्षा जास्त मानतो. नथुराम गोडसे बद्दल एकाने वक्तव्य केलं तर त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा हा अप्रत्यक्षपणे अपमान नाही आहे का?

..पर जंजीर मे जकडा शंभू राजा मेरा अब भी सब पे भारी हैं

औरंगजेब बदमाश, लफंगा आणि छत्रपती संभाजी महाराज छावा आमच्यासाठी अभिमान, स्वाभिमान आणि गर्व आहे. औरंगजेबाने स्वतः आपल्या बापाला कैद करून त्याला पाणी देखील पाजले नाही. गरमीच्या दिवसांमध्ये जेव्हा त्याने पाणी मागितलं, तेव्हा औरंग्याने बापाला जिवंत राहायचं असेल तर राहा अथवा मर असं सांगितलं. यावर शहाजानंनी कवितेतून प्रत्युत्तर देताना म्हटलं की, तुझ्यापेक्षा इथले भारतीय बरे तू जिवंतपणी आपल्या बापाला पाणी देत नाही. पण हा देश आणि इथले लोक पितृपक्षात आपल्या मेलेल्या पूर्वजांचीही पूजा-अर्चना करून पाणी पाजतात. त्यात तू कसा पुत्र आहे, जो जिवंत बापालाही पाणी देत नाहीस. सध्या देशभरात छावा सिनेमा सुरू आहे. त्या छावा सिनेमातील एक कवी कलशांचा संवाद आहे, त्यात ते म्हणतात ‘हाती-घोडे, तोफ, तलवारे फौंज तेरी सारी हैं, पर जंजीर मे जकडा शंभूराजा मेरा अब भी सब पे भारी हैं. अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सभागृहात भाष्य केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.