oarfish : ओअरफिश या माश्याचं रहस्य काय आहे? हा मासा खरोखर समुद्री राक्षस आहे का?

37
oarfish : ओअरफिश या माश्याचं रहस्य काय आहे? हा मासा खरोखर समुद्री राक्षस आहे का?

ओअरफिश (oarfish) नावाचा मासा हा महासागरामध्ये साधारणपणे ३,२८० फूट म्हणजेच १,००० मीटर पर्यंतच्या खोल समुद्रात आढळतो. म्हणूनच तो इतर माशांपेक्षा फार कमी प्रमाणात दृष्टीस पडतो. पण बऱ्याचदा असं होतं की, हा मासा सागरात येणाऱ्या वादळ, भूकंपाच्या आधी किंवा नंतर, तसंच जखमी झाल्यावर त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये ६५६ फूट म्हणजेच २०० मीटर एवढ्या खोलीवरही आढळतो. तसंच तो कधीकधी समुद्राच्या पृष्ठभागावरही येतो. पण अशी घटना घडण्याची शक्यता खूप कमी असते.

ओअरफिश (oarfish)  मासा हा लांबसडक सापाप्रमाणे दिसतो. समुद्रात पोहताना या माशाच्या फक्त परांचीच हालचाल होते, त्याच्या शरीराची फार हालचाल होत नाही. ओअरफिश मासा फक्त प्रजनन करण्यापुरताच आपल्या प्रजातीसोबत राहतो. इतर वेळी हे मासे एकांतपणे आयुष्य घालवतात.

(हेही वाचा – harihar fort : हरिहर किल्ल्याबद्दलची अद्भुत माहिती वाचून तुम्ही व्हाल थक्क!)

ओअरफिशचं माणसांसाठी काय महत्त्व आहे?

खोल पाण्यात राहणाऱ्या या माशाला खाण्यासाठी पकडलं जात नाही. याचं कारण असं की, या माशाच्या मांसाचा दर्जा अतिशय निकृष्ट असतो. त्यामुळेचं ओअरफिशला अजिबात व्यावसायिक मूल्य नाही. या माशाचं मांस जेलीसारखं असतं असं मांस खाद्य मानलं जात नाही. पण काही लोक या माशाला रत्नामासा मानतात. त्यामुळे ते खोल समुद्रात जाळे टाकून यांना पकडण्याचा प्रयत्न करतात.

महासागराच्या पृष्ठभागावर पोहताना किंवा एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर फिरताना ओअरफिश हा मासा माणसांना क्वचितच दिसतो. त्यांतही जिवंत ओअरफिश (oarfish) मासा दिसणं हे खूपचं दुर्मिळ आहे.

(हेही वाचा – Manipur मध्ये खंडणी आणि तस्करीमध्ये सहभागी असलेले 3 अल्पवयीन मुलांसह 5 अतिरेक्यांना अटक)

ओअरफिश माणसांसाठी धोकादायक आहे का?

ओअरफिशच्या (oarfish) सर्वांत जवळचा प्रजातीतला स्ट्रीमर फिश म्हणजेच अ‍ॅग्रोस्टिचथिस पार्केरी हा मासा इलेक्ट्रोजेनिक असल्याचं नोंदवलं गेलं आहे. हा मासा माणसांच्या हाती लागला तर माणसांना विजेचा एक सौम्य धक्का बसतो. ओअरफिशमध्ये ही विजेचा धक्का देण्याची क्षमता आहे की नाही, हे अजूनही कळलेलं नाही.

ओअरफिश (oarfish) माशाचं रिबनसारखं दिसणारं शरीर ३६ फूट एवढ्या लांबीपर्यंत वाढू शकतं. त्याचं लांब, चपट, निमुळतं शरीर हे पारदर्शक चांदीसारखं दिसतं. या माशाच्या शरीराच्या वरच्या भागावर, माशाच्या लांबीपर्यंत पर असतात. या परांचा वापर तो पोहण्यासाठी करतो. हा एक अतिशय खोल महासागरात राहणारा मासा आहे. हे मासे कधीकधी उभ्या असलेल्या खांबासारखेही पोहतात. समुद्री राक्षसाच्या दंतकथा कदाचित या माशामुळेच प्रचलित झाल्या असाव्यात.

ओअरफिश (oarfish) मासे हे अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्रात तसंच दक्षिण कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेकडच्या टोपांगा बीचपासून ते पूर्व पॅसिफिक महासागरातल्या चिलीपर्यंत मोठ्या प्रमाणात आढळतात. ही ठिकाणे मानवी निरीक्षणांवरून सांगण्यात आली आहेत. तरीही ध्रुवीय क्षेत्रातील समुद्र वगळता ओअरफिश मासा ही एक वैश्विक प्रजाती असल्याचं मानलं जातं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.