समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापले आहे. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, त्याचे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये धर्माची लढाई नव्हती तर सत्तेची लढाई होती, असे विधान आमदार अबू आझमी केले होते. आता अबू आझमी (Abu Azmi) यांनी केलेल्या विधानावरून उत्तर प्रदेशातही राजकारण तापले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अबू आझमी यांच्या विधानावरून चांगलेच भडकले आहेत. “कंबख्तको UP भेज दो, इलाज हम करेंगे”, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या मुद्द्यावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी दिलेल्या विधानावरून उत्तर प्रदेशातही राजकारण सुरू आहे. उत्तर प्रदेश विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेत या मुद्द्यावर भाष्य केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, समाजवादी पक्ष औरंगजेबला आदर्श मानत आहे. औरंगजेबाचे वडील शाहजहान त्यांच्या चरित्रात लिहितात की, देवाने असा दुर्दैवी माणूस जन्माला येऊ नये अशी प्रार्थना करतो. त्याने आपल्या वडिलांना आग्रा किल्ल्यात कैद केले. त्या हरामखोराला पार्टीतून हाकलून लावा. त्याला एकदा उत्तर प्रदेशला पाठवा, आम्ही त्याला उपचार देऊ. त्याला भारतात राहण्याचा अधिकार असावा का? समाजवादी पक्षाने याचे उत्तर द्यावे, तुम्ही अबू आझमी (Abu Azmi) यांना पक्षातून का काढून टाकत नाही? मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मी समाजवादी पक्षाच्या मित्रांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला भारताच्या वारशाचा अभिमान वाटत नसेल, तर किमान तुम्ही राम मनोहर लोहिया यांचे ऐकले पाहिजे होते. त्यांनी म्हटले होते की, भारताच्या एकतेचे तीन आधार आहेत – भगवान राम, भगवान शिव आणि भगवान कृष्ण. मुख्यमंत्री योगी असेही म्हणाले की, डॉ. राम मनोहर लोहिया हे एक कट्टर समाजवादी होते. आज समाजवादी पक्ष लोहियाजींच्या विचारांपासून खूप दूर गेला आहे. आज भारताच्या वारशाला शिव्या देणे हे समाजवादी पक्षाचे उद्दिष्ट बनले आहे.
Join Our WhatsApp Community