
-
प्रतिनिधी
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री अतुल सावे (Atul Save) यांचे खास अभिनंदन केले आहे. सावे (Atul Save) यांनी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करत ५४ ओबीसी वसतिगृहे सुरू केली, त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा – औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे Abu Azmi निलंबित; सुधीर मुनगंटीवारांनी केले जोरदार भाषण)
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान, अतुल सावे (Atul Save) यांनी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांची माहिती सभागृहात दिली. राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी निवासाची मोठी समस्या आहे. त्यावर तातडीने निर्णय घेत, सावे (Atul Save) यांनी प्रस्तावित ७२ वसतिगृहांपैकी ५४ वसतिगृहे सुरू केली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना राहण्याची चांगली सुविधा मिळणार आहे.
(हेही वाचा – Cyber Crime : राज्यात सायबर गुन्हेगारांची संख्या वाढली; वर्षभरात सात हजार कोटींची सायबर लूट)
याशिवाय, ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. या पावलामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि विद्यार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळेल. सभागृहातील सर्व सदस्यांनी सावे यांच्या या कार्याचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी देखील त्यांचे अभिनंदन करत, इतर मंत्र्यांनीही अशाच पद्धतीने काम करावे, असे मत व्यक्त केले. ओबीसी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी घेतलेल्या या निर्णयाचे समाजाच्या विविध स्तरांतून स्वागत केले जात आहे. सरकारच्या या पुढाकारामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community