Narveer Tanaji Malusare समाधी परिसर सुशोभीकरणासाठी १० कोटींचा निधी मंजूर

48
Narveer Tanaji Malusare समाधी परिसर सुशोभीकरणासाठी १० कोटींचा निधी मंजूर
  • प्रतिनिधी

नरवीर तानाजी मालुसरे (Narveer Tanaji Malusare) यांच्या समाधी परिसराच्या सुशोभीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून, त्यासाठी संपूर्ण निधीही अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी विधानपरिषदेत भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी केली.

आज प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित करताना दरेकर म्हणाले की, “शासनाने या प्रकरणात लक्ष घालून काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. उंबरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे (Narveer Tanaji Malusare) यांची समाधी असून, त्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी आधी ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, काम अपेक्षित वेगाने होत नाही. त्यामुळे सरकारने अतिरिक्त निधी मंजूर करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.”

(हेही वाचा – Abu Azmi ला उत्तर प्रदेशला पाठवा, आम्ही त्यांच्यावर उपचार करू; औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले)

यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले की, “मी वित्त विभागाचा राज्यमंत्री असताना अर्थसंकल्पीय उत्तरादरम्यान सभागृहात या निधीची घोषणा केली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र, काही कारणांमुळे हे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. आता संबंधित विभाग माझ्याकडे आहे, त्यामुळे मी यावर त्वरित कार्यवाही करणार आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “२०२४-२५ या आर्थिक वर्षात नरवीर तानाजी मालुसरे (Narveer Tanaji Malusare) यांच्या समाधी परिसराच्या सुशोभीकरणासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, याची खात्री मी सभागृहाला देतो.” या घोषणेमुळे तानाजी मालुसरे (Narveer Tanaji Malusare) समाधी परिसराच्या विकासाचे काम वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.