Chhatrapati Sambhaji Maharaj कैद झालेल्या सरदेसाई वाड्याचे सरकार स्मारकात रुपांतर करणार

औरंगजेब याला हुलकावणी देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्यात थांबले होते, मात्र फितुरीमुळे औरंगजेबाला त्यांचा हा ठावठिकाणा लागल्याने महाराजांना इथे कैद करण्यात आले.

779
छत्रपती संभाजी महाराजांना (Chhatrapati Sambhaji Maharaj) औरंगजेबाच्या सैनिकांनी संगमेश्वर येथे असलेल्या सरदेसाई वाड्यात कैद केले होते. या वाड्याची पडझड झाली आहे. त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी याविषये प्रश्न विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरदेसाई वाड्यात भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सरदेसाई वाड्यातील स्मारकाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराज थांबले होते. हा वाडा ताब्यात घेऊन तिथे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचे स्मारक उभारण्याकरिता राज्य सरकार पुढाकार घेईल. छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचे प्रतिक आहे. ते धर्मवीर, स्वराज्यरक्षक आहेत.

काय इतिहास आहे सरदेसाई वाड्याचा? 

औरंगजेब याला हुलकावणी देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्यात थांबले होते, मात्र फितुरीमुळे औरंगजेबाला त्यांचा हा ठावठिकाणा लागल्याने महाराजांना इथे कैद करण्यात आले. याच वाड्यातून त्यांना नेण्यात आले. छावा चित्रपटात हा सीन दाखविण्यात आल्यानंतर अनेक शिवप्रेमींना संगमेश्वरमधील सरदेसाई वाड्यात जात आहेत. मात्र याठिकाणी दुरवस्था झाल्यामुळे शिवप्रेमी यांना वाईट वाटत आहे. त्याची दखल आता सरकारने घेतली असून स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.