आचरा समुद्रात Olive Ridley Turtle च्या ११० पिल्लांना समुद्रात सोडले

58
आचरा समुद्रात Olive Ridley Turtle च्या ११० पिल्लांना समुद्रात सोडले

मालवण तालुक्यात आचरा समुद्र किनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले (Olive Ridley Turtle) जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण प्रेमी कासव मित्र सूर्यकांत धुरी यांनी संवर्धन केलेल्या कासवाच्या अंड्यातून जन्मलेल्या ११० कासव पिल्लांना अंगणवाडीतील मुलांच्या हस्ते समुद्री अधिवासात सोडण्यात आले आले. आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात कासव (Olive Ridley Turtle) मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. यावेळी कांदळगाव येथील वनरक्षक संजीव जाधव, सूर्यकांत धुरी, नितांत कुबल, केशव कुबल, पोलीस पाटील तन्वी जोशी, जगन्नाथ जोशी, पिरावाडी येथील अंगणवाडी मदतनीस श्रावी परडकर, सृष्टी धुरी, पिरावाडी येथील अंगणवाडीचे बाल विद्यार्थी उपस्थित होते.

(हेही वाचा – Ladki Bahin योजनेतील १,५०० चे २,१०० रुपये अनुदान वाढ लांबणीवर?)

सुर्यकांत धुरी यांनी सरकारी नियमाप्रमाणे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करत ५१ दिवसांनी त्या अंड्यांपासून बाहेर पडलेल्या ११० पिल्लांची (Olive Ridley Turtle) बॅच आचरा समुद्रात सोडली. आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले कासवांची (Olive Ridley Turtle) अंडी सापडून आली होती. या वर्षाच्या सुरुवाती पासून कासव (Olive Ridley Turtle) संवर्धनास वेग आला असून तब्ब्ल २८ घरटी आचरा किनाऱ्यावर तयार करण्यात आली आहेत. यातील या बॅच टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे. ही कासवाची अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यांपूर्वीपासून समुद्र किनारी संरक्षित करण्याचे काम कासव मित्रांनी हाती घेतले आहे. आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होत असून या किनाऱ्यांना पसंती देत आहेत.

(हेही वाचा – मंत्री Manikrao Kokate यांच्या शिक्षेला स्थगिती; नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय)

अॕलिव्ह रिडले (Olive Ridley Turtle) या कासव जमातीची कासवे या किनाऱ्यास पसंती देताना दिसत आहेत. आचरा ते तळाशील कासवांच्या अंडी घालण्याचा किनारा म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जाऊ लागला आहे. या भागातील ग्रामस्थ ही अंडी सुरक्षित ठेऊन अन्य हिंस्त्र प्राण्यांपासून त्यांचे जतन करत आहेत. दोन महिन्यानंतर पिल्ले बाहेर पडली की वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात सोडत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.