जर मंगळसूत्र नाही, टिकली नाही, तर मग तुमचा पती तुमच्यात रस कसा घेईल; Judge ने थेट महिलेलाच केली विचारणा

विभक्त झालेले जोडपे त्यांच्या घरगुती हिंसाचाराच्या वादाच्या मध्यस्थीसाठी न्यायाधीशांसमोर हजर झाले होते.

205

पुणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश (Judge) अंकुर आर जहागीरदार हे एका विभक्त पती-पत्नीमधील मध्यस्थीचे काम पाहत होते, त्यांनी महिलेला मंगळसूत्र किंवा टिकली न लावण्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तुम्ही मंगळसूत्र घालत नाही, टिकली लावली नाही, जर तुम्ही विवाहित महिलेसारखे वागला नाहीत, तर तुमचा नवरा तुमच्यात रस का दाखवेल, असे न्यायाधीशांनी म्हटले.

विभक्त झालेले जोडपे त्यांच्या घरगुती हिंसाचाराच्या वादाच्या मध्यस्थीसाठी न्यायाधीशांसमोर हजर झाले होते. न्यायाधीश (Judge) जहागीरदार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एका जोडप्यामधील पोटगीच्या वादाशी संबंधित आणखी एका प्रकरणाबद्दल अशीच माहिती शेअर केली आहे. ज्यामध्ये एका सत्र न्यायाधीशाने (Judge) म्हटले आहे की, जर एखादी महिला चांगली कमाई करत असेल, तर ती नेहमीच तिच्यापेक्षा जास्त कमाई करणारा पती शोधेल आणि कमी कमाई करणाऱ्या व्यक्तीशी कधीही समझोता करणार नाही. तथापि, जर चांगला कमाई करणारा पुरूष लग्न करू इच्छित असेल, तर तो घरात भांडी धुणाऱ्या मोलकरणीशीही लग्न करू शकतो. पुरुष किती लवचिक आहेत ते पहा. तुम्हीही थोडी लवचिकता दाखवली पाहिजे. इतके कठोर होऊ नका.”

post

(हेही वाचा Abu Azmi ला उत्तर प्रदेशला पाठवा, आम्ही त्यांच्यावर उपचार करू; औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले)

बार अँड बेंचशी बोलताना न्यायाधीश (Judge) जहागीरदार म्हणाले की, दुसऱ्या घटनेतील महिला तिला विचारलेल्या प्रश्नावर रडली. माझ्या पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या दुसऱ्या घटनेबाबत, ती महिला माझी स्वतःची क्लायंट आहे आणि प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. २०२३ मध्ये जेव्हा पती०पत्नीमध्ये मध्यस्थी झाली तेव्हा ती अयशस्वी होण्याचे एक मोठे कारण म्हणजे मध्यस्थ न्यायाधीशांनी केलेले बेताल भाष्य. महिलेच्या मुद्द्यांवर ते न्यायाधीश अत्यंत असभ्य होते. न्यायाधीशांनी निर्माण केलेल्या वातावरणामुळे क्लायंट महिला रडली. जेव्हा असे घडते तेव्हा, पक्षकार मध्यस्थीवरील विश्वास गमावतात, ज्यामुळे तोडगा काढणे कठीण होते आणि न्यायव्यवस्थेचा भार वाढतो कारण मध्यस्थांच्या चुकीमुळे सोडवता येणारे खटले प्रलंबित राहतात, असे जहागीरदार पुढे म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.