-
प्रतिनिधी
पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथे १२ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार (Gangrape) झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना अटक केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी येथे राहणारी १२ वर्षाची मुलगी काका रागावले म्हणून घर सोडून निघून गेली होती. या दरम्यान तिला एक तरुण भेटला, तो तिला घेऊन मरीन ड्राईव्ह येथे आला व त्यानंतर त्याने पुन्हा तिला जोगेश्वरी येथे आणून सोडले. दरम्यान रात्रीच्या वेळी तिला पाच तरुण भेटले आणि तिला घेऊन ते एका आरोपीच्या घरी घेऊन आले, व त्यापैकी तिघांनी तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार (Gangrape) केला, आणि एकाने प्रयत्न केला. (Gangrape)
(हेही वाचा – नवी मुंबई विमानतळासाठी भूसंपादनाचा निर्णय Bombay High Court ने केला रद्द)
दुसऱ्या सकाळी आरोपींनी पीडित मुलीला घरी जाण्यास सांगितले, परंतु पीडित मुलगी घरी न जाता, आरोपींच्या पाठोपाठ ती जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर आली. तेथून ती दादर रेल्वे स्थानकावर आली. दादर रेल्वे स्थानकावर पिडीत मुलगी एकटी फिरत असताना रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती जोगेश्वरी येथे राहण्यास असल्याचे रेल्वे पोलिसांना सांगितले. रेल्वे पोलिसांनी जोगेश्वरी पोलिसांकडे संपर्क साधला असता जोगेश्वरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ पीडित मुलीचा ताबा जोगेश्वरी पोलिसांकडे दिले. जोगेश्वरी पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला असता तिने तिच्या जबाबात तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची (Gangrape) माहिती दिली. जोगेश्वरी पोलिसांनी तात्काळ पाच जणांविरुद्ध भा. न्या. सं. कलम ६५ (२),७० (२) ७४,३५१(३)३(,५) पोक्सो कायदा कलम ४,६,८,१० अनव्ये गुन्हा दाखल करून पाचही नराधमांना अटक करण्यात आली आहे. (Gangrape)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community