सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवी मुंबईच्या (Navi Mumbai) महापे (Mahape) येथे अत्याधुनिक सायबर सुरक्षा केंद्र (Center for Cyber Security) उभारले जात आहे. याठिकाणी कृत्रिम बुद्धीमत्ता आणि क्लाउड आधारित प्रणालींचा वापर केला जाणार असून राज्यातील ५० सायबर पोलिस ठाणे या प्रणालीशी जोडले जाणार आहेत. सायबर फसवणूक झाली तर त्वरित कारवाई करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. (Yogesh Kadam)
( हेही वाचा : Corruption : धारावी हप्ता वसुली, चार पोलीस अंमलदार निलंबित)
विधानपरिषदेत आ. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar), आ. सुनील शिंदे (Sunil Shinde) आदी सदस्यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री कदम म्हणाले, सायबर गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने सायबर सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी ८५० कोटींचा निधी देण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांना वेळीच रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. (Yogesh Kadam)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community