ऱनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईने नवी मुंबईतील उच्चशिक्षित व्यक्तींद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका हाय-प्रोफाइल ड्रग्जचे सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. आतापर्यंत, एनसीबी (NCB) सहा जणांना अटक केली आहे आणि २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ (Drugs) जप्त केले आहेत. गेल्या दोन वर्षांत या सिंडिकेटने भारतातील अनेक राज्यांमध्ये ११२८ कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केल्याचे तपासात उघड झाले आहे. (Crime)
(हेही वाचा – Sahitya Akademi च्या साहित्य उत्सवाचे 7 ते 12 मार्च दरम्यान दिल्लीत भव्य आयोजन)
जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये राबवण्यात आलेल्या सुरुवातीच्या कारवाईचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कौतुक केले होते. एनसीबीच्या (NCB) सूत्रांनुसार, प्रमुख आरोपी नवीन चिचकर सध्या परदेशात आहे आणि भारतातील सहकाऱ्यांच्या मदतीने तो दूरस्थपणे सिंडिकेट चालवतो. लंडनमध्ये चित्रपट आणि टेलिव्हिजनसह गुन्हेगारी मानसशास्त्राचा अभ्यास केलेला चिचकर देशाबाहेरून कारवाया नियंत्रित करत असल्याचे मानले जाते. अटक करण्यात आलेल्या आणखी एका आरोपीनेही परदेशात शिक्षण घेतले आहे, तर इतर दोघे पदवीधर आहेत. हे सिंडिकेट प्रामुख्याने कोकेन आणि हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक कॅनॅबिसचा (गांजा) व्यवहार करते, अमेरिकेतून हवाई मालवाहू शिपमेंटद्वारे मुंबईत या पदार्थांची तस्करी करते. “मुंबईत आल्यानंतर, भारतातील विविध राज्यांमध्ये ड्रग्ज वितरित केले जात होते. स्थानिक पातळीवर ड्रग्ज विकण्याव्यतिरिक्त, सिंडिकेट ते ऑस्ट्रेलियासह परदेशी बाजारपेठेत पुन्हा निर्यात करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे,” असे एनसीबीच्या (NCB) एका अधिकाऱ्याने सांगितले. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community