
- ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकाचा (Champions Trophy) अंतिम सामना आता ठरला आहे. येत्या ९ तारखेला भारत आणि न्यूझीलंडचे संघ अंतिम सामन्यात एकमेकांशी भिडतील. दुसऱ्या उपान्त्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ५० धावांनी पराभव केला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमवर सगळ्या गोष्टी न्यूझीलंडच्या मनासारख्याच होत गेल्या. आधी त्यांनी नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. मग पहिल्या चेंडूपासून फटकेबाजीचा इरादा स्पष्ट केला. सलामीवीर विल यंग आठव्या षटकांत ४८ धावांवर बाद झाला. पण, त्यानंतर रचिल रवींद्र (Rachin Ravindra) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) ही जोडी जमली ती काल बाद होण्याच्या मूडमध्येच नव्हती. रवींद्रने १०१ चेंडूंमध्ये १०७ तर विल्यमसनने ९४ चेंडूंत १०२ धावा केल्या. आणि तिथेच किवी संघ तीनशेच्या पार जाणार हे स्पष्ट झालं. दोघांनी १६७ धावांची भागिदारी केली. पुढे डेरिल मिचेलच्या ४७ आणि ग्लेन फिलीपच्या २७ चेंडूंत ४९ धावांमुळे न्यूझीलंड संधाने निर्धारित ५० षटकांत ३६२ धावांची मजल मारली.
दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनडिनीने ७३ धावांत ३ बळी मिळवले. बाकी गोलंदाजांचं पृथ:करण पाहण्यासारखं नव्हतंच. हे आव्हान कठीणच होतं. आणि त्यातच आफ्रिकन डावांत एकही मोठी भागिदारी झाली नाही. बवुमा (५६) आणि ड्युसेन (६९) यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०५ धावा जोडल्या. त्यानंतर पुढे गडी ठरावीक अंतराने बाद होत गेले.
(हेही वाचा – Crime : एनसीबीने २०० कोटींच्या अंमली पदार्थांसह ६ जणांना केली अटक)
New Zealand enter the #ChampionsTrophy final on the back of a convincing win 👊
Match Highlights 🎥https://t.co/RAgoGd5Ob9
— ICC (@ICC) March 5, 2025
सहाव्या क्रमांकावर आलेल्या डेव्हिड मिलरने (David Miller) थोडी थोडी फटकेबाजी केली. आणि ६७ चेंडूंत नाबाद १०० धावा केल्या. यात त्याने ४ षटकार आणि १० चौकार ठोकले. पण, या फटकेबाजीला उशीर झाला होता. शिवाय दुसऱ्या बाजूने त्याला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. पण, आफ्रिकन संघाने निदान ३०० धावांचा टप्पा ओलांडला.
न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने ३ बळी घेतले. तर रचिल रवींद्रने २० धावांत एक बळी मिळवला. शिवाय दोन झेलही घेतले. या अष्टपैलू कामगिरीसाठी रचिल रवींद्रच (Rachin Ravindra) सामन्यांत सर्वोत्तम ठरला. आता अंतिम सामना ९ मार्चला दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community